माणुसकी जपत आनंद राजगुरू यांनी केला दुर्धर आजारांनीं ग्रस्त व अनाथ मुलांन सोबत वाढदिवस साजरा
जामखेड प्रतिनिधी
मोठा गाजा करत, डीजे लावुन अथवा रस्त्यावर केक कापून अनावश्यक खर्चाला फटा देत माणुसकी जपत दुर्धर आजारांनीं ग्रस्त व अनाथ मुलांसोबत जामखेड येथील व्यापारी आनंद राजगुरू यांनी आपला वाढदिवस साजरा करुन समाजामधे एक आदर्श निर्माण केला आहे.
नेहमी प्रमाणे आपण आपला वाढदिवस केक कापून किंवा सोशल मीडिया मधे स्टेटस ठेवून तसेच मोठा गाजावाजा करत डीजेच्या तालावर नाचत स्वतःचा वाढदिवस साजरा करत असतो. यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च देखील होत असतो. मात्र या सर्वांना फाटा देत जामखेड येथील व्यापारी आनंद राजगुरू यांनी आपला वाढदिवस इन्फंट इंडिया, पाली, जिल्हा बीड या प्रकल्पातील दुर्धर आजारांनीं ग्रस्त व अनाथ मुलांन सोबत साजरा करुन समाज्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे.
समाजाने नाकारलेल्या, दुर्धर आजारांनीं ग्रस्त आणि दगावलेल्या पालकांच्या पाल्याचे पालकत्व स्वीकारून, त्यांना एका तपापेक्षा अधिक कालावधीपासून त्यांचं संगोपन शिक्षण आणि पुनर्वसन करत असलेले दत्ताभाऊ बारगजे सर यांच्या सेवेतला सहवास त्यांनी एकट्याने नव्हे तर सहकुटुंब अनुभवला. आनंदवनातील काही सुखद क्षणाचे अनुभव कृतीतून देऊन त्यांनी आपल्या पुढील पिढीसाठी देखील एक आदर्शवत ठरेल असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. आनंद राजगुरू यांनी आगळा वेगळा वाढदिवस साजरा केल्याने आनंद द्विगुणित झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
चौकट
फ्लेक्स बोर्ड लावून किंवा चौकात टू व्हीलर वर केक कापून गर्दी करताना फटाके फोडणाऱ्या व त्यातून समाज्याला त्रास होतोय याची जाणीव नसलेल्या तरुणांना आनंद राजगुरू यांनी स्वत: चा वाढदिवस कसा साजरा करावा याचा हा प्रसंग म्हणजे कृतिशील दाखला आहे , माझा मित्र युवा उद्योजक आनंद राजगुरू यांचा आदर्श आपण सगळ्यांनी नक्की घेतला पाहिजे एक आदर्श उपक्रम राबवल्या बद्दल श्री आनंद राजगुरू व त्याचे कुटुंबीय यांचे मनपूर्वक अभिनंदन.