लोकसभा निवडणुक निकाला पुर्वीच झळकले जामखेड तालुक्यात निलेश लंके यांच्या अभिनंदनाचे बॅनर
जामखेड प्रतिनिधी
आहील्यानगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जुन रोजी लागणार आहे. मात्र त्या पुर्वीच कोण निवडुन येणार यासाठी आहील्यानगर दक्षिण मध्ये पैंजा लागल्या असतानाच जामखेड तालुक्यातील लोणी याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्या विजयाच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. लोणी येथील अन्सार पठाण या युवा कार्यकर्त्याने अभिनंदनाचे बॅनर आपल्या गावात लावले आहेत.
आहील्यानगर दक्षिण लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीची झाली आहे. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र खा. डॉ. सुजय विखे हे पुन्हा एकदा भाजपा महायुतीकडून उमेदवार असल्याने मंत्री विखे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली असून, विरोधात असलेले शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार पारनेरचे आ. निलेश लंके यांनीदेखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या पाठबळावर ही निवडणूक लढवली आहे.
खा. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजीमंत्री प्रा. राम शिंदे, पंकजा मुंडे व राज्याचे विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, या राजकीय दिग्गजांनी नगर दक्षिण मध्ये सभा घेतल्या आहेत. तर लंके यांच्या प्रचारादरम्यान माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्यासह खा. संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील व आ. रोहित पवार यांनी लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन शेवटपर्यंत निवडणुकीचे वातावरण तापते ठेवले होते.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांची निवडणूक प्रचंड गाजत आहे. १३ मे रोजी मतदान संपल्यानंतर या निवडणूकीची रंगत आणि उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चहाच्या व पानाच्या टपरीवर ,कीराणा दुकानात आणि बाजारपेठेत सर्वत्र एकच चर्चा आहे, की विखे निवडुन येणार की लंके निवडून येणार ? विषेश म्हणजे कार्यकर्त्यांन मध्ये आनेक ठिकाणी गुप्त पैंजा देखील लागल्या आहेत.
निवडुन कोण येणार यावर पैंजा लागल्या आसतानाच जामखेड तालुक्यातील लोणी व लोणी फटा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते अन्सार पठाण यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच आहील्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले असल्याने जामखेड तालुक्यातील एकच चर्चेचा विषय ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here