आ. प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या निधीमुळे खा. सुजय (दादा) विखे पाटील यांना मताधिक्य देणार-संचालक पै नंदु (आबा) गोरे

जामखेड प्रतिनिधी

आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून खर्डा पंचायत समिती गणातून खासदार सुजय दादा विखे पाटील यांना भरघोस असे मताधिके देऊन विजय करण्याचा संकल्प जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा आपटी ग्रामपंचायत चे सरपंच नंदू आबा गोरे यांनी केला आहे.

यावेळी बाजार समितीचे संचालक म्हणाले की आमचे नेते माजी मंत्री आमदार प्रध्यापक राम शिंदे साहेब यांनी आपटी व पिंपळगाव आळवा या रस्त्याच्या डांबरीकरण रस्त्यासाठी एक कोटीचा निधी देऊन या दोन-चार गावाच्या येण्या जाण्याचा रहदारीचा प्रश्न मिटवला तसेच जगदाळे वस्ती ते आपत्ती या रस्त्यासाठी डांबरीकरणाला 92 लाख रुपयांचा निधी देऊन राऊत वस्ती या ठिकाणीही डांबरीकरणासाठी निधी देण्यात आला आहे. तसेच खर्डा पंचायत समितीच्या गणांमध्ये व आपटी परिसरातील अनेक गावांमध्ये आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी रुपयांचा निधी दिला असून आज जगायचे कामे सुरू आहेत तसेच आपली येथील दत्त मंदिर यास या ठिकाणी फिलिंग ब्लॉक बसवण्यासाठी 15 लक्ष रुपये देऊन आज रोजी मंदिराचे सुशोभीकरण झाले आहे. तसेच गावांमध्ये अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे तसेच जामखेड पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साठी वॉल कंपाऊंड बांधकामासाठी 14 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

तसेच दीनदुबळ्या गरीब दलित वस्ती मध्ये चार लाख रुपयांचे यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच या सर्व विविध विकास कामासाठी दिलेल्या कोट्यावेधीच्या निधीमुळे खासदार सुजय दादा विखे पाटील यांना जामखेड तालुक्यातील खर्डा सर्वाधिक खर्डा गटातील खर्डा पंचायत समिती घनातून सर्व अधिक मत अधिक के देऊन विजय करण्याचा संकल्प बाजार समितीचे संचालक तथा सरपंच नंदू आबा गोरे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here