दुकान बंद करण्याची वेळ आल्यानेच शरद पवार यांनी पक्ष विलीनीकरणाचे संकेत दिले -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत
जामखेड प्रतिनिधी
सध्या वारं फीरलेलं आहे, शरद पवार यांना त्यांचा पक्ष चालवणे शक्य होणार नाही त्यामुळेच त्यांनी विलीनीकरणाचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांना आपले दुकान बंद करण्याची वेळ आली आहे. ते लवकरच कॉंग्रेस मध्ये विलिन होणार असुन सोबत उद्धव ठाकरे यांना पण घेऊन जाणार आसे भाकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील जाहीर सभेत केले आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खा. सुजय विखे यांच्या विरोधात आ. निलेश लंके अशी तगडी फाईट होणार आहे. नगर दक्षिण मध्ये भाजप महाविकास आघाडीने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याच अनुषंगाने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दि ९ मे रोजी दुपारी चार वाजता जामखेड येथील बाजारतळ या ठिकाणी भव्य आशी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक देशाला सुरक्षित आणि विकिसाकडे घेऊन जाणारी निवडणूक आहे. यासाठी देशाला विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून द्यायचे आहे. कॉंग्रेस मध्ये कोणीच कोणाचे एकत नाही पंतप्रधान झाले तर संगीत खुर्ची सारखी खुर्ची मिळवण्याचा प्रयत्न करतील. मोदींचे इंजीन मजबुत आहे या इंजिनला वेगवेगळे डबे जोडले आहेत. मात्र कॉंग्रेसच्या इंजिनमध्ये फक्त नेतेच आहेत, तिथे जनतेला बसण्यास जागा नाही. आघाडीतील नेत्यांना कन्व्हीन्सही करता येत नाही म्हणून ते जनतेला कन्फ्युज करत असल्याची टीका त्यांनी केली.
आ. प्रा. राम शिंदे यांनी पालकमंत्री आसताना व खा सुजय विखे खासदार आसताना त्यांनी आपल्या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. दुसरे निवडुन दिलेले आमदार फक्त बोलबच्चन करतात. आ. प्रा राम शिंदे यांचा मी बेरर चेक आहे. जेवढ्या योजनांना नीधी पाहीजे तेवढा नीधी तुम्हाला मिळेल. येणाऱ्या विधानसभेला पुन्हा आ. प्रा राम शिंदे व आ. सुरेश धस व खासदार म्हणून डॉ सुजय विखेंना निवडून द्या तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
खा. सुजय विखे पाटील बोलनता म्हणाले की २५० कोटींचा निधी जामखेड शहरातील रस्त्यांसाठी दिला आहे. नगर करमाळा हा ६३ की. मी चा २ हजार कोटींचा रस्ता १८ महीन्यात पुर्ण केला. विशेष म्हणजे जामखेड ते आहील्यानगर साठी पुन्हा ६५० कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी मंजुर करुन आणला तो देखील संपुर्ण कॉंक्रेट रस्ता होणार आहे. पारनेर भागात गोरगरीब लोकांवर काय अन्याय झाला त्यांनी कीती अत्याचार सहन केला हे त्या भागातील लोकांना विचारा. दोन नंबर वाल्यांना दोन नंबरचेच बटन दिले, मात्र मला तीन नंबर मिळाला कारण तिसर्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना निवडून देऊन देशाचे पंतप्रधान करायचे आहे.
महाराष्ट्र कृष्णा प्लट डायवर्शन ही ४ हजार कोटींची योजना सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये दर वर्षी वाहुन जाणारे पुराचे पाणी हे डायवर्शन कॅनॉल च्या माध्यमातून सर्व दुष्काळी भागात पोहचणार आहे. याचा फायदा नगर दक्षिण भागाला देखील होणार असुन कर्जत जामखेड साठी ही योजना कशी आनता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्याला नगर दक्षिण चा दुष्काळ हटवायचा आहे मात्र यासाठी खा. सुजय विखे यांच्या माध्यमातून पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे आहे.
आ. प्रा राम शिंदे बोलताना म्हणाले की सध्याच्या विरोधी आमदाराने स्मशान भुमीची जागा घेऊन बांधण्यासाठी व्यापाऱ्यांवर दबाव आणला, वर्गण्या गोळा केल्या, लोकांना त्रास देण्याचे काम केले मात्र सत्ता गेल्यावर दोन्ही हातांनी रडण्याची वेळ आली कारण पाप केल्यावर अशीच वेळ येते मी पुण्य केल्यामुळे पुन्हा आमदार झालो. तसेच कर्जत जामखेड मतदारसंघातुन जाणाऱ्या करमाळा जामखेड पाटोदा व जामखेड कुसडगाव राशीन या मार्गांना नीधी मंजुर करण्याची मागणी आ. प्रा राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
यावेळी उमेदवार खा. सुजय विखे पाटील, आ. प्रा राम शिंदे, आ. सुरेश धस, आ. भिमराव धोंडे, चित्राताई वाघ, उमेश पाटील, ता.अध्यक्ष अजय काशिद, शेखर खरमाटे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, शिवसेना तालुकाप्रमुख. प्रा कैलास माने सर , मनसे तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे, सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन सर गायवळ, रवी सुरवसे, पवनराजे राळेभात, सरपंच संजीवनीताई लोंढे पाटील, संध्याताई सोनवणे, आर्चनाताई राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, मोहन गडदे, बाजीराव गोपाळघरे, बिबीशन धनवडे, बापुराव ढवळे, अण्णा ढवळे, विष्णु गंभीरे, प्रविण बोलभट, सह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी मानले.