स्वामी समर्थ प्रकट दिन व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्द आश्रमा केले अन्नदान वाटप
जामखेड प्रतिनिधी
स्वामी समर्थ प्रकट दिन व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या वाढदिवसानिमित्त भुम तालुक्यातील अंतरवाली येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ कै ह भ प गहिनीनाथ लोखंडे महाराज यांच्या वृद्धाश्रमात वयोवृद्धांना मोफत अन्नदानाचे वाटप करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बाल विकास केंद्र दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त परमपूज्य गुरुमाऊली यांच्या वाढदिवसा निमित्त दि 10 एप्रिल 2024 रोजी वृद्धाश्रम श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ कै ह भ प गहिनीनाथ लोखंडे महाराज यांच्या वृद्धाश्रमात अंतरवली तालुका भूम येथे श्री स्वामी समर्थ सेवेकरी दिंडोरी प्रणित खर्डा यांनी अन्नदानाच्या हेतूने 50 किलो गहू, ५० किलो तांदूळ, 30 किलो ज्वारी, 5 किलो साखर, 5 किलो शेंगदाणे 15 किलो तेलाचा डबा 1 बिस्किटाचा बॉक्स 10 मीठ पुडे 1 कांद्याची 50 कीलोची गोणी इत्यादी साहित्य वाटण्यात आले.
यावेळी त्या ठिकाणी उपस्थित सेवेकरी ॲड श्रीकांत (भाऊ) खटावकर, ज्ञानेश्वर मिसाळ, ऋतुजा कोतमिरे, वैष्णवी गवसने, सुजित लोंढे, शुभांगी भोसले, प्रसाद भोसले, सानिका पवार, रोहित चव्हाण, ऋषी उगले व वृद्धाश्रमातील निराधार 32 वयोवृद्ध उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here