आर्थिक दुर्बल मुस्लिम समाजातील महिलांना किराणा किटचे वाटप
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जामखेडचा नाविन्यपूर्ण उपक्रम….
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई. शाखा जामखेड च्या वतीने जामखेड शहरातील मुस्लिम समाजातील ज्या महिला आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना रमजान सण साजरा करण्यासाठी आर्थिक चणचण भासत आहे आशा काही गरजूंना किराणा किट वाटप करण्यात आले. जेने करून त्या माऊली रमजान सण आनंदाने साजरा करू शकतील.
खरोखरच हा उपक्रम खूप मानवता वादी विचार समोर ठेवून केलेला उपक्रम आहे. विस गरजु महिलांना किराणा किट भेट देण्यात आले… आणि विशेष म्हणजे पत्रकार संघाने हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले होते.. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा जामखेड चे शहर अध्यक्ष फायक भाई सय्यद यांनी या कामी पूढाकार घेतला आहे. स्वखर्चाने सय्यद फायक अली हा उपक्रम केलेला आहे.. सय्यद हे अनेक वर्षे पासुन असे आवाहन समाज उपयोगी उपक्रम करत आहेत. समाजातील गोर गरीब महिलांना कपडे भेट म्हणून देत आले आहेत. गोर गरीब लोकांना रोख रक्कम रमजान सणाच्या निमित्ताने भेट देत आहेत.
अनेक लोकांना औषध उपचार घेण्यासाठी पैसे नसतात अशा लोकांना सय्यद फायक हे रूग्णांना आर्थिक मदत करतात. समाजातील गरीब लोकांच्या चेहरावर हास्य फुलवीनयाचे सय्यद हे करत आले आहेत.. आणि विशेष म्हणजे धार्मिक भेद न करता आसे उपक्रम सय्यद करत आले आहेत. सामाजिक सेवा.. हेच ध्येय समोर ठेवून काम करत आहेत.. या उपक्रमाचे जामखेड शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. सय्यद यांचे अभिनंदन होत आहे.
एरवी समाजातील काही लोक पत्रकारांकडे वेगळ्या नजरेने बघत असतात. अशा लोकांना ही चपराक आहे. असी बोलकी प्रतिक्रिया एका राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. समाजातील सर्व थरातून किराणा किट भेट उपक्रमाचे कौतुक होत आहे.