जामखेड येथे महीला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव, रक्तदान, गैरव पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथे महीला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती महोत्सवानिमित्त जामखेड येथे उत्सवानिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा, रक्तदान शिबीर, गैरव पुरस्कार व विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. शेवटच्या दिवशी जामखेड शहरातुन भव्य महीलांच्या वतीने मिरवणूक देखील काढण्यात आली होती.
जगदंबा प्रतिष्ठान, राजमुद्रा युवा मंच जामखेड तसेच शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी काशिद या गेल्या बारा वर्षापासून सर्व महिलांना घेऊन अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करतात. यात रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच परिसरातील विविध क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, महिलांची भव्य दिव्य मिरवणूक रक्तदान शिबीर अशा पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. यात परिसरातील सामान्यातून असामान्य कर्तृत्व निर्माण करणाऱ्या मान्यवर यांना जामखेड भूषण व जामखेड गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात असामान्य कर्तृत्व निर्माण करणारे, गोरगरिबांना मदत करणारे, शिक्षण, स्वच्छता, अध्यात्मिक, धार्मिक कार्यात आपल्या कामाचा ठसा उमटविलेले स्वर्गीय विठ्ठल आण्णा राऊत यांना मरणोत्तर जामखेड भूषण पुरस्कार देण्यात आला. तसेच शारिरीक कसरती, मल्लखांब, लाठीकाठी, भालाफेक, तलवार बाजी या शिवकालीन युद्ध कौशल्य शिकविणारे, राष्ट्रीय पातळीवर चमकणारे विद्यार्थी घडविणारे संतोष (बबलू) टेकाळे व शिक्षकी पेक्षा करत बचतगट व पतसंस्था स्थापन करून पाच जिल्ह्यात 52 पतसंस्था व पाच हजार बचतगट निर्माण करणारे ज्योती क्रांती पतसंस्थेचे चेअरमन आजीनाथ हजारे या दोघांना जामखेड गौरव पुरस्काराचे सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बापुसाहेब देशपांडे होते. यावेळी पुरस्कार विजेते आजीनाथ हजारे, बबलू टेकाळे, विठ्ठल आण्णा राऊत यांचा पुरस्कार स्वीकारणारे विनायक राऊत, महेश राऊत, यावेळी
प्रा. मधुकर राळेभात, अनंता खेत्रे, डॉ. प्रताप चौरे, डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. वैभव तांदळे, डॉ. शशांक शिंदे, डॉ. भारत दारकुंडे, निलेश पवार, भीमराव डुचे, मनोज भोरे, भरत जगदाळे, नगरसेवक बिभीषण धनवडे, बाळासाहेब आरेकर, किरण उदारे, अवी बेलेकर, सुरज काळे, अक्षय बारहाते, अजय गौड, कैलास खेत्रे, पप्पू काशिद, प्रताप काशिद, सुनील यादव, संजय बेरड, मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टाफरे, उमेश राऊत, दिपक सुरसे, भैय्या कात्रजकर, विजय काशिद, अल्ताफ शेख, प्रविण चोरडिया, लहू बोराटे, नामदेव राळेभात, निलेश बोळे, ऋतुराज फुटाणे, हनुमंत वराट,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे लहू बोराटे आदर्श शिक्षक, कृष्णा वराट साहाय्यक विक्रीकर अधिकारी, अविराज वराट महसूल साहाय्यक, गायत्री राळेभात पीएसआय, सुभाष सोनटक्के पीएसआय, भाऊसाहेब गोपाळघरे पीएसआय यांचाही सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील नवे तर राज्यातील हा अनोख्या पद्धतीने महिला आयोजित कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात दि. 27 रोजी दिवसभर रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते यात सुमारे 135 रक्तदात्यांनी रक्तदान करत छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.
जाणता राजा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेडमध्ये महिला अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी संजय काशिद यांनी केले होते यावेळी रक्तदान शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य मिरवणूक, शिवजन्मोत्सव सोहळा, पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी रोहिणीताई काशिद, विजयाताई गुगळे, सुरेखा सदाफुले, कांचन दाहितोंडे, मीना बेलेकर, सुनिता बोराटे, ज्योती राऊत, विद्या भोसले, आरती राळेभात, सोनाली पवार, कामिनी राजगुरू, सारिका जमदाडे, उपस्थित होत्या.
२७ मार्च रोजी सायंकाळी ७.०० वा. तालुकास्तरीय सांस्कृतिक नाट्यछटा स्पर्धा पार पडल्या यात सुमारे वीस टीम सहभागी झाल्या होत्या. याचे परिक्षक म्हणून अविनाश बोधले, संतोष सरसमकर, रजनीकांत साखरे, आढाव सर यांनी केले. दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
२८ मार्च २०२४ पालखी सोहळा व भव्य महिला रँली आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बीड रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज पेठ, लक्ष्मीआई चौक (संविधान चौक) सायंकाळी ८.०० शिवरायांची महाआरती व सांस्कृतिक कार्यक्रमात विजेत्या तसेच विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा निर्माण करणाऱ्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा सन्मान सोहळा तसेच शिवजन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद वाटप करण्यात आले.