रत्नदीपचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक, नोडल महीला अधिकार्‍यांच्या मनमानी विरोधात जामखेड येथे रास्ता रोको
जामखेड प्रतिनिधी
रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेच्या नोडल ऑफिसर सौ जोत्स्ना बुधगावकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात उद्या शनिवार दि ३० रोजी सकाळी शहरातील खर्डा चौकात बेमुदत रास्तारोको आंदोलनात करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना रीतसर निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसापासून रत्नदीप मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या शारीरिक मानसिक व आर्थिक छळवणूकी विरोधात आंदोलन चालू होते. या आंदोलना दरम्यान सर्व सरकारी संस्था संबंधित विद्यापीठांनी नोडल ऑफिसर चे नेमणूक करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची व्यवस्था निर्माण केली असता, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेने देखील सौ जोत्स्ना बुधगावकर यांची नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नेमणूक करण्यात आली होती. त्या वेळोवेळी जामखेड येथे येऊन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी संस्थेची आर्थिक तोडजोडी केल्याचा संशय आहे व त्या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांची पिळवणूक करत आहेत. तरी सौ जोत्स्ना बुधगावकर यांची नोडल ऑफिसर पदावरून नियुक्ती रद्द करून दुसऱ्या न्याय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा उद्या शनिवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी वाजल्यापासून जामखेड येथील खर्डा चौकामध्ये सर्व विद्यार्थी व जामखेड मधील नागरिक सामुदायिक रित्या बेमुदत रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. यावेळी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सौ जोत्स्ना बुधगावकर यांना जबाबदार धरण्यात यावे आसे देखील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देता वेळी विद्यार्थी व जामखेडचे नागरीक उपस्थीत होते. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, शिवपरतिष्ठानचे अध्यक्ष पांडूराजे भोसले, मनसेचे तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे , सामाजिक कार्यकर्ते केदार रसाळ, सर्व पक्ष, संघटना व समस्त जामखेडचे विद्यार्थी व नागरीक या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार आहेत.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here