

निवारा बालगृहात बाफना परिवाराने स्वखर्चाने दोन खोल्या बांधुन दिला २० मुलींना निवारा
निवारा बालगृहात दोन खोल्यांच्या वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न
जामखेड प्रतिनिधी
निवारा बालगृहात मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या आकाश बाफना यांना निराधार मुलांना याठिकाणी रहाण्याची आडचण आहे, हीच खंत लक्षात घेऊन बाफना परिवाराने निवारा बालगृहातील २० मुलींसाठी स्वखर्चाने दोन खोल्या बांधुन दिल्या. याचा नुकताच लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या बाफना परिवारातील युवा उद्योजक आकाशजी बाफना यांनी आपली मुलगी क्रिशाचा पहिला वाढदिवस मोहा फाटा येथील निवारा बालगृहात साजरा केला होता. यावेळी निवारा बालगृहात असणाऱ्या अनाथ मुलींना राहण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था नव्हती हीच अडचण लक्षात घेऊन या २० मुलींसाठी दोन रूमचे वसतीगृह बांधण्याचा संकल्प केला होता.

आकाशजी बाफना यांनी लगेच काही महिन्यांपूर्वी दोन रूम वसतीगृहात बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. आज ते बांधकाम पूर्ण झाले आहे या रूमचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यामुळे अनाथांना आश्रय देण्याचे पवित्र काम बाफना परिवारातील आकाशजी बाफना यांनी केले आहे.
यामध्ये वीस मुलींसाठी कायमस्वरूपी राहण्याची सोय झालेली आहे. परिसरातील अनाथ निराधार मुलांना आश्रय देण्याचे काम अँड डॉ. अरूण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा फाटा येथील समता भूमी निवारा बालगृहात सुरू आहे. बाफना परिवाराने मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन रूम वसतीगृह बांधण्याचा संकल्प केला होता तो पूर्ण केला आहे यामुळे आनाथांना आश्रय देण्याचे काम बाफना परिवाराने केले आहे. यामुळे बाफना परिवाराने कौतुक होत आहे.

दोन खोल्या वसतीगृहचा लोकार्पण सोहळा तसेच युवा उद्योजक आकाश बाफना व रोशनजी बाफना यांनी आपला वाढदिवस निवारा बालगृहात चिमुकल्या सोबत साजरा केला. यावेळी संस्थेचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण आबा जाधव, संस्थेचे व्यवस्थापक संतोष चव्हाण, अनभुले सर व संस्थेचे सर्व सहकारी मित्र सर्वांनी हार्दिक आभार मानले.

यावेळी उपस्थित एन महेश चे संचालक महेश नगरे , दिलीप (काका) बाफना, अभय बाफना, गौतम बाफना, मिथुन शेठ बाफना, अनिल शेठ बाफना, कृष्णराव चव्हाण सर, परशुरामजी भांगे ,अशोक कुमटकर, गणेश भवर, बाळासाहेब नवसरे, यश भंडारी, निलेश देशमुख, दत्तात्रय जगताप व बाफना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते तसेच सेवा भावी बाफना परिवार मधील सर्व महिला वर्ग उपस्थित होते.





