ए. यु. गुगळे पतसंस्थे कडुन धनगरवस्ती शाळेला २१ हजारांची मदत.
जामखेड प्रतिनिधी
एच. यु. गुगळे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जामखेड ता.जामखेड, जि.अहमदनगर या पतसंस्थेने जि. प. प्रा. शाळा धनगरवस्ती शाळेला २१,०००/-₹ रुपयांची मदत पाठवली आहे. या संस्थेचे चेअरमन तथा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रमेश भाऊ गुगळे यांनी धनगरवस्ती शाळेबद्दल माहिती जाणून घेतली. शाळेची गरज ओळखून शाळेच्या विकास कामासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून रोख स्वरूपात २१,०००/- रुपयांची मदत धनगरवस्ती शाळेच्या शाळा सुधार खात्यामध्ये वर्ग केली.

आदरणीय रमेश भाऊ पतसंस्थेच्या माध्यमातून सातत्याने विविध सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत असतात. शिक्षण हे त्यांचं आवडतं क्षेत्र आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन काय घडत आहे यावर ते लक्ष ठेवून असतात. त्यांचे संवेदनशील मन आणि समाजभान त्यांना सतत सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घ्यायला भाग पाडतं.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रभरामध्ये एच.यु गुगळे कापड दुकान व रमेश भाऊ गुगळे सर्वांना सुपरिचित आहे. कामाचा प्रचंड व्याप असून सुद्धा धनगरवस्ती सारख्या छोट्याशा शाळेकडे लक्ष देऊन शाळेची गरज ओळखून मदत पाठवणं हे त्यांच्या संवेदनशीलतेचं व सामाजिकतेचं अप्रतिम उदाहरण आहे. रमेश भाऊ व एच.यु.गुगळे नागरी पतसंस्थेचे धनगरवस्ती शाळेचे पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानन्यात आले आहे.
जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ साहेब, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब कें. प्र. श्री. केशव गायकवाड साहेब, मुख्याध्यापक जालिंदर चिलगर सर यांनी रमेश भाऊ गुगळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व धनगरवस्ती शाळेला केलेल्या मदतीबद्दल मनस्वी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here