आम आदमी पक्षाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी संतोष नवलाखा यांची निवड
विविध मान्यवरांकडून होत आहे संतोष नवलाखा यांचे अभिनंदन
जामखेड प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी करत असलेल्या कामांची दखल घेत आम आदमी पक्षाच्या वतीने जामखेड शहरातील धडाडीचे संतोष नवलाखा यांची आज आम आदमी पक्षाच्या जामखेड तालुका अध्यक्षपदी संतोष नवलाखा एकमताने निवड करण्यात आली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर येथे झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आघाव, उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, शरद शिंदे, शहरअध्यक्ष भरत खकाळ मेजर, जिल्हा संघटक सुभाष केकान, महासचिव प्रकाश फराटे, सचिव प्रा.अशोक डोंगरे, जिल्हा प्रवक्ते ॲड. महेश शिंदे यांच्या हस्ते व अहमदनगर जिल्हा कमिटी यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. यावेळी ॲड. बिपिन वारे, अजय भोसले, सुंदर परदेशी, गोकुळ शेठ परदेशी,दिपक शेळके, ऋषिकेश गांगर्डे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी कोरोना काळात खाजगी हाॅस्पिटलस् विरूद्ध केलेल्या अंदोलनामुळे एक कोवीड सेंटर बंद झाले. तसेच शहरातील लाईट, रस्ते, पाणी, तपनेश्वर शाळेसाठी संरक्षक भिंत व इतर सुविधा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच याबाबत लोकप्रतिनींचेही लक्ष वेधण्याचे काम केले आहे. संतोष नवलाखा यांच्या निवडीने आम आदमी पार्टीला जामखेड तालुक्यात चांगले बळ मिळणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here