भास्कर मोरेला न्यायालयाने सुनावली वनविभागाची चार दिवसांची कोठडी.
जामखेड प्रतिनिधी
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरेला विनयभंग प्रकरणी एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्या नंतर जामखेड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावणी होती. यानंतर वनविभागाने दाखल आसलेल्या गुन्ह्याच्या संबधात ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भास्कर मोरेला वनविभाची चार दिवसांची कोठडी सुनावणी आहे.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर विरोधात गेल्या दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले यांचे उपोषण सुरु आहे. दि १३ रोजी नगर एलसीबी व जामखेड पोलीसांनी भास्कर मोरेला अटक केली होती. दोन दिवसांपुर्वी जामखेड न्यायालयाने विनंभंग प्रकरणी मोरेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी होती. यानंतर दुसर्‍या दिवशी मोरेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावणी होती. न्यायालयीन कोठडी मिळाल्या नंतर वन्यप्राणी पाळल्या प्रकरणी वनविभागाकडुन दाखल आसलेल्या गुन्ह्यासंबधित डॉ भास्कर मोरेला वनविभागाने ताब्यात घेतले होते. काल दि १६ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने मोरेला पुन्हा वनविभागची चार दिवसांची कोठडी सुनावणी आहे.
वनविभागाने दि. १० मार्च रोजी रत्नदीप मेडिकल फाउंडेशन परिसरात तपासणी केली होती यावेळी एक जखमी हरीण आढळून आले होते. यानुसार वनविभागाने रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे विरोधात वन्य जीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. यावेळी साहाय्यक वन संरक्षक राहुरी गणेश मिसाळ, मोहन शेळके वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत जामखेड, वनरक्षक प्रविण उबाळे, रवी राठोड, शांतीनाथ सपकाळ, नागेश तेलंग, दक्षता पथक बडे डी एम, बी एस भगत, ताहेभाई सय्यद, एस.पी डोंगरे, एस.व्ही चिलगर, एस.एन नेहरकर, आर.एस सुरवसे, एस.के सुर्यवंशी व एच .के. माळशिकारे या पथकाने सदर कारवाई केली होती.
तसेच वनविभागाला अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या काही हरीण मारून पुरले आहे अशी तक्रार होती तेव्हा जेसीबीच्या साहाय्याने अनेक ठिकाणी शोधकार्य सुरू होते यावेळी काही प्राण्यांचे केस व एक हाड आढळून आले होते. ते तपासणी साठी नागपूर येथे फॉरेंसीक लॅबकडे पाठवले आहे. तसेच कालही काही प्राण्यांचे शिंग आढळून आले होते यानुसार ही तपासणी सुरू आहे.
वन्य जीव संरक्षण कायद्याखाली भास्कर मोरे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आता जर तपासणी मधे हाड व शिंगे कशाचे निघतात हे पाहाणे औचीत्याचे ठरणार आहे. जर का हाड व शिंगे कॉलेज मधिल संबधित हरणाचे निघाले तर पुन्हा भास्कर मोरेच्या अडचणीत आनखी वाढ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here