रोखठोक न्यूज जामखेड…..
तालुक्यातील जातेगाव येथील काळे वस्तीवर एकाने अफुची झाडे शेतात लावली आसल्याची गुप्त माहिती जामखेड पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड त्यांनी आपल्या पथकासह प्रत्यक्ष त्या ठिकाणी छापा टाकून शेतात लावलेली 1 लाख 70 हजारांची 56 कीलो वजणाची झाडे जप्त केली.
पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहीती मिळाली की जामखेड तालुक्यातील जातेगाव या ठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या शेतात अफुची झाडे लावली आहेत. त्यामुळे दि 25 रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी स्वतःहा त्या ठिकाणी पो. हे कॉ संजय लाटे, संदिप आजबे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ, संदिप राऊत, अविनाश ढेरे यांच्या पथकासह त्या ठिकाणी गेले व खात्री करुन घेतली व त्या ठिकाणी जाऊन पाहिले आसता आरोपी वासुदेव महादेव काळे रा. काळे वस्ती, जातेगाव याने त्याच्या मालकीच्या गट नंबर 1077 मधिल शेतात 56 कीलो वजणाची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली 1 लाख 69 हजार 815 रुपये कीमतीची अफुची झाडे लावली आसल्याचे आढळून आले. त्या नुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी या ठिकाणी छापा टाकून सर्व झाडे जप्त केली असुन आरोपीस अटक केली आहे.
जामखेड पोलीस स्टेशन चे पो.हे.कॉ संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी वासुदेव महादेव काळे याच्या विरोधात अमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन 1985 च्या कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.
wonderful and incredible blog site. I really want to thanks, for providing us better details.
great as well as impressive blog site. I actually wish to thank you, for providing us better info.