

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जवळके या गावात माणूसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानुसार गावातील एका आरोपीने १३ वर्ष ७ महिने वयाच्या मुलीवर बलात्कार केला आला असून या घटनेमुळे संपुर्ण जामखेड तालुक्या सहखर्डा परिसरात खळबळ उडाली असून आरोपी सध्या फरार आहे.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की दि ८ जानेवारी ते दि १० मार्च रोजीचे रात्री वाजे पर्यंत जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळके येथील फिर्यदीचे घराच्या पाठीमागे शेताच्या बांधावर यातील फिर्यादी अल्पवयीन पीडित मुलगी वय १३ वर्षे ७ महिने हिला आरोपी ऋषी पिमराव वाळुंजकर रा.जवळके याने वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या राहते घराच्या मागे व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बळजबरी करून तिचे बरोबर शारीरिक संबंध केले आहेत.

त्यानुसार अल्पवयीन पिडीत हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ऋषी पिमराव वाळुंजकर रा. जवळके ता.जामखेड याचे विरुध्द बलात्कार व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करत असून गुन्ह्यातील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आजही मुली सुरक्षित नसल्याचे समोर येत असून सदर आरोपीस लवकरात लवकर अटक करावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.







