दादा आमच्या सर्व मुलिंना त्या भास्कर मोरेने लय छळलयं, असे म्हणत मुलींना कोसळले रडु…
आ. रोहित पवार यांनी घेतली आंदोलनकर्यांशी भेट, पाच तास केली चर्चा
जामखेड प्रतिनिधी
दादा तो भास्कर मोरे आमच्या प्रत्येक वैयक्तिक गोष्टीत लक्ष घालतो, त्याच्या मनासारखे वागले नाही तर रील्हॉलवर काढुन मुलींना मारण्याच्या धमक्या देतो, आमचे आयुष्य खराब केले आहे, आम्हाला भयंकर त्रास देऊन खुप छळलयं असे म्हणत अमानवी माणुसकीला काळिमा फासणार्या मात्र न सांगता येणार्या कुकृत्याचा पाठा वाचत असतानाच मुलींना आ. रोहित पवार यांच्या व अधिकाऱ्यांन समोरच रडु कोसळले.
गेल्या आठ दिवसांपासून रत्नादीप मेडिकल फाउंडेशन चा अध्यक्ष डॉ भास्कर मोरे विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात सातव्या दिवशी आ. रोहित पवार यांनी विद्यापीठ प्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकारी, आंदोलनकर्ते विद्यार्थी व उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठान चे पांडुराजे भोसले यांच्या बरोबर सुमारे पाच तास चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी भास्कर मोरे यांच्या अमानवी मानुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा न सांगता येणाऱ्या कुकृत्याचा पाढा वाचला.
छळवणुक झालेल्या विद्यार्थ्यांनीनी पुढे बोलताना सांगितले की आम्ही मागिलवेळी पाच मुलींनी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिले मात्र पोलिसांना दिलेले तक्रारी अर्ज पोलिसांकडून डॉ भास्कर मोरेकडे गेले. त्यातक्रारी अर्जावरून त्याने कॉलेजच्या मुलींना खुप टार्चेर केले. जिथे पोलिसाकडुनच सुरक्षिततेच्या बाबी संभाळल्या जात नाहीत. तिथे आम्ही मुली कशा थांबणार. आम्हाला हे मेडिकल काॅलेज सुरक्षित वाटत नाही. कॉलेजमध्ये कसलाही आभ्यासक्रम शिकवला जात नाही. कॉलेज तपासणीसाठी विद्यापिठाची समिती आल्यावर आम्हाला रुग्ण बनवुन सलाईन लावले जाते, मग न शिकवता डिग्री अशीही भेटणार आहे. फक्त पैसे भरा व मोकळे व्हा असे भास्कर मोरे मूलींना सांगतो. अन् सांगितले ते नाही केले तर…….. असं सांगतांना अक्षरश मूलींना रडू कोसळले. त्यामुळे उपस्थितांचेही डोळे पानावले.
सिनियर मुलींकडून जूनिअर मूलींना जबरदस्तीने (वालिटीयर) शिकविण्यास भाग पाडले जाते. रोज कॉलेजमध्ये मनावर दडपण ठेवून जातो. बाहेरून आलेल्या पाहूण्यांना प्रशासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांसमोर या विद्यार्थीनी माझ्या मुलीसारख्या आहेत. स्वच्छ प्रतिमा स्वतःहून सांगतो अन् माझी मूलगी म्हणतो नंतर त्याच मूलींबरोबर फ्लर्ट करतो. लज्जास्पद बोलतो. विद्यार्थी अन् शिक्षक या नात्याला मोरे याने कलंक लावला आहे. असे सांगत तीव्र संतापजनक भावना मुलींनी रडत रडत व्यक्त केल्या. आम्हाला आमचे कॉलेज बदलून मिळाले नाही तर आम्ही जीवनाचं बरं वाईट करू असा इशारा रत्नदीपच्या उपोषणकर्त्या काही मला मुलींनी दिला आहे. पुढे बोलताना एका मुलीने सांगितले की मुली फीर्याद दाखल करायला तयार आहेत तर पोलिस म्हणतात नंतर करू, नंतर बघू असं वारंवार सांगुन टाळाटाळ करतात असेही उपोषणकर्त्यां मुलींनी अधिकारी व आ. रोहित पवार यांच्या समोर सांगितले.
मुलींच्या सर्व धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर आ. रोहित पवारला म्हणाले की आ. रोहित पवार याला खिशात ठेवणारं कोणीही अजून जन्मलेले नाही. मुलींनी तक्रार केलेली व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याच्यावर कारवाई होणारच. रत्नदीपच्या मूलां मुलींच्या शैक्षणिक जीवनाचा प्रश्न आहे कोणीही राजकारण आणु नये. तसेच आ. रोहीत पवार हा तुमचा मोठा भाऊ म्हणून आज आणि पुढेही तुमच्या बरोबर न्यायासाठी लढायला उभा आहे. तुमचे कॉलेज ट्रान्सफर करण्याचा पुर्ण प्रयत्न करू. जामखेड कर्जतचे नागरिक चांगले आहेत म्हणूनच बाहेरगावच्या मूलमूलींच्या पाठीशी एकजूटीने उभे आहेत. असे सांगून आमदार रोहित पवार यांनी रत्नदीपच्या उपोषणकर्त्यां मूलामूलींना आश्वस्त केले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, तहसीलदार गणेश माळी, पोलीस निरीक्षक महेश पाटील, उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले, संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब, केदार रसाळ, रमेश आजबे, यांच्या सह महसूल, पोलीस, वनविभाग, आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी. विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेकडो अंदोलक, धारकरी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
चौकट
रत्नदीपच्या मूलामूलींच्या सर्वच प्रकारच्या तक्रारींची दखल घेऊन गून्हे दाखल करू तसेच मुलींच्या तक्रारीची गोपनीयता ठेवुन कारवाई करणार आहे. डॉ भास्कर मोरेच्या मागावर आमचे पोलिस आहेत कोणत्याही क्षणी त्याला अटक होऊ शकते असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले.