विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही – डॉ. संदीप पालवे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने घेतली उपोषणकर्त्या विद्यार्थींची भेट
जामखेड प्रतिनिधी
रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर मध्ये प्राचार्य नाही, प्राध्यापक नाही, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे संपुर्ण शिक्षण बंद आहे. आशा कॉलेज मध्ये विद्यार्थी राहु शकतील का हा ऐरनीचा प्रश्न आहे. सध्या संपुर्ण परीक्षेचा कालावधीत सुरू झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची जबाबदारी विद्यापीठ घेईल असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप पालवे यांनी उपोषणकर्ते विद्यार्थींना दिले.
गेल्या चार दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात तहसील कार्यालया समोर विद्यार्थींचे व शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांचे उपोषण सुरू आहे. उपोषण कर्त्यांना आज दि ८ रोजी दुपारी बारा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप पालवे, डॉ.अमोल घोलप, प्रा. जी.वाय दामा यांच्या समितीने भेट दिली.
पुढे बोलताना समितीचे अध्यक्ष डॉ पालवे म्हणाले की या कॉलेजचा विषय खुपच गंभीर आहे पालकांच्या समाज्याच्या भावना तीव्र आहेत, आनेक प्रश्न आहेत विद्यार्थींच्या पैशाचा प्रश्न आहे माणसीकतेचा छळवणूकीचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न वेग वेगळे आहेत. यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमून सखोल चौकशी करावी लागणार आहे. या विद्यार्थ्यांची दखल घेतली आसुन विद्यार्थींना न्याय देण्याचे काम समिती करणार आहेत.
या कॉलेजची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाने बी फार्म सीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया बंद केली आहे. परीक्षेच्या दुष्टीने विद्यार्थींचे नुकसान होऊ न देता त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन आंदोलकांन समोर कमीटीचे अध्यक्ष डॉ. संदीप पालवे यांनी दिले.
यावेळी बोलताना उपोषण कर्ते पांडुराजे भोसले बोलताना म्हणाले की आज महीला दिना दिवशी मुली उपोषण करत असताना खा. सुजय विखे आ. रोहित पवार व आ.राम शिंदे यांनी या घटनेकडे लक्ष दिले पाहिजे होते मात्र अजुन कोणताही लोकप्रतिनिधी उपोषणाकडे फीरकला नाही. तसेच लवकर गुन्हा दाखल न केल्याने पोलीस प्रशासनावर देखील पांडुराजे भोसले यांनी ताशेरे ओढले. यावेळी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, केदार रसाळ, रमेश (दादा) आजबे, हवा सरनोबत सह अनेक विद्यार्थींनी देखील आपल्या तक्रारी समितीच्या सदस्यांन समोर मांडल्या.
यानंतर दुपारी सदरच्या पथकाने दुपारी तीन वाजता रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरची चौकशी केली असता कॉलेज मध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या यामध्ये सहा लॅब समिती सदस्य तहसीलदार गणेश माळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या सहीने सील करण्यात आले. हा संपुर्ण अहवाल वरीष्ठांना सादर करणार असल्याची माहिती समितीने दिली आहे.
चौकट
मुलींनी समितीसमोर आपल्या भावना व्यक्त करताना मुलींना आश्रु अणावर झाले होते. यावेळी संपुर्ण ग्रामस्थ देखील भावना विवष झाले होते.