डॉ. भास्कर मोरे यांची राष्ट्रीय महिला व राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी

मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला जामखेड तालुका वकील संघाचा पाठिंबा

जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्याकडून होत असलेल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाच्या विरूद्ध विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला जामखेड तालुका वकील संघाचा जाहीर पाठिंबा आज रोजी देण्यात आला आहे.

या कॉलेजमध्ये मुली अजिबात सुरक्षित नाहीत ही गंभीर परिस्थिती आहे. म्हणून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी तातडीने याची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे व राज्य महिला आयोगाकडे करून त्यांना निमंत्रित करून सखोल चौकशी करावी तसेच सक्षम महिला पोलीस अधिकारी निमंत्रित करून मुलींच्या मानसिक शारीरिक, अर्थिक शोषणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. याकरिता समस्त रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे विद्यार्थी व विद्यार्थिनींना उपोषण करता जामखेड तालुका वकील संघाचा जाहीर पाठिंबा आहे.

यावेळी अध्यक्ष ॲड. शमा हाजी कादर, उपाध्यक्ष, ॲड. नितीन घुमरे, सचिव ॲड. कृष्णा शिरोळे,ॲड. संग्राम पोले, ॲड. महारुद्र नागरगोजे, ॲड. पोपट कात्रजकर, ॲड. जैद सय्यद, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, ॲड सुमित बोरा, ॲड. मोहन कारंडे, ॲड. प्रदीप बोलभट, ॲड. प्रविण ससाणे, ॲड. नितीन राजपूरे, ॲड. अजिनाथ जायभाय आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here