जामखेड तालुक्यात शिक्षण क्रांतीचा सारोळा शाळेने रोवला मानाचा तुरा…!
जामखेड प्रतिनिधी
शिक्षण विभाग आपल्या दारी या अभिनव संकल्पनेतून ,जामखेड तालुक्यातील शिक्षण क्रांतीचे प्रणेते, कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकरी बाळासाहेब धनवे साहेब यांनी जामखेड पंचायत समिती शिक्षण विभाग टीमसह आज बुधवार, दि. 6 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा शाळेला सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात अहमदनगर जिल्ह्यात सारोळा शाळेने द्वितीय क्रमांक संपादन करत पाच लाख रूपये बक्षिसांचे मानकरी ठरल्या बद्दल, सारोळा शाळेचे मुख्याध्यापक शहाजी जगताप सर, पदवीधर शिक्षक माजीद शेख सर राहुल लिमकर सर, उपाध्यापक खंडेराव सोळंके सर, प्रशांत होळकर सर, सौ. शबाना शेख मॅडम, सौ. अमृता रसाळ मॅडम यांचा फेटा, शाल व गुलाबपुष्प सह यथोचित सन्मान धनवे साहेब व सहकारी टीमच्या वतीने करण्यात आला. तसेच सरपंच सौ. रितुताई काशिद, अजयदादा काशिद, उपसरपंच हर्षद मुळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर सातपुते, उपाध्यक्ष राजेंद्र आजबे व सर्व ग्रामस्थ टीमचे विशेष अभिनंदन यावेळी साहेबांनी मनोगत व्यक्त करताना केले.तसेच NMMS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा,मंथन परीक्षा या शालेय स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांना जिलेबी भरवत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली.
या कार्यक्रम प्रसंगी जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय बाळासाहेब धनवे साहेब, जामखेड बीट शिक्षण विस्तार अधिकारी तथा राजुरी केंद्रप्रमुख सुरेश मोहिते, अरणगाव केंद्रप्रमुख विक्रम बडे, खर्डा व तेलगंशी केंद्रप्रमुख केशव गायकवाड, पाटोदा केंद्रप्रमुख राम निकम, विकास मंडळ विश्वस्त तथा वाकी शाळेचे मुख्याध्यापक मुकंद सातपुते, बसरवाडी शाळेचे मुख्याध्यपक एकनाथ चव्हाण सर, तपनेश्वर शाळेचे उपाध्यापक प्रताप पवार सर, सोनवणे सर, मडके सर, सारोळा ग्रामस्थ प्रतिनिधी शहाजी नाना पवार तसेच सारोळा शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.









