जामखेड येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने “स्वच्छ जल,स्वच्छ मन कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याचा – अमित गंभीर
जामखेड प्रतिनिधी
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा जामखेड च्या वतीने दि. २५ फेब्रुवारी रोजी प्रोजेक्ट अमृत “स्वच्छ जल, स्वच्छ मन या अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी सकाळी ८ ते दुपारी १२ .०० पर्यंत उपस्थित रहावे.
सद्गुरू माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपेने व बाबा हरदेव सिंग जी महाराज यांच्या मानवतेच्या कल्याणकारी कार्याची शिकवण घेऊन संपूर्ण भारतात १६०० हून अधिक ठिकाणी जलाशय स्वच्छ करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे मोठे योगदान आहे.
“स्वच्छ जल, स्वच्छ मन या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेत ही परियोजना अवघ्या भारत वर्षात जवळपास १६०० पेक्षा अधिक ठिकाणी २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील ९०० शहरांमध्ये एकाच वेळी राबवले जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याचा विकल्पाबाबत जनसामान्यांना जागृत करून येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य स्वस्थ करणे हा उद्देश आहे. बाबा हरदेव सिंग जी महाराज यांच्या प्रेरणादायी शिकवणुकीचे अनुसरण करत संत निरंकारी मिशन मार्फत स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ वर्ष २०२३ मध्ये
केला आहे. या परियोजनेचा मुख्य उद्देश जलसाठ्यांचे संरक्षण, त्यांची स्वच्छता व जनसामान्यांमध्ये याविषयी जागरूकता अभियान राबवून त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे.
यामध्ये जामखेड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शाखा जामखेडचे समन्वयक अमित गंभीर यांनी केले आहे.










