अखेर शरद पवार गटाला मिळालं नवीन चिन्ह, निवडणूक आयोगाकडून घोषणा
मंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार यांना नव्या पक्षाचं नाव मिळालं होतं. आता नवीन पक्षाला निवडणूक चिन्हही मिळालं आहे. या संदर्भात शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार यांना नव्या पक्षाचं नाव मिळालं होतं. आता नवीन पक्षाला निवडणूक चिन्हही मिळालं आहे. या संदर्भात शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे.
काय आहे पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. निवडणूक आयोगाचे पत्र पोस्ट करत शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली आहे. “एक तुतारी द्या मज आणुनि” या कवितेच्या काही ओळी यात लिहिण्यात आल्या आहेत.
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”
यावरच आपली प्रतिकिया देताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ”तुतारी ही युद्धाची निशाणी आहे. यापुढे जो रणसंग्राम होणार आहे, त्याची तयारी करताना तुतारी वाजवली की लोक सोबत येतील. हे नकळत भाग्यात आलं आहे. युद्धाला वेळ काळ नसतो.”
ते म्हणाले, आमचं चिन्ह थांबवावं, आमच्या पक्षाला नाव मिळू नये, म्हणून प्रयत्न झाले. मात्र काहीही झालं नाही. आम्हाला नावही मिळालं आणि चिन्हही मिळालं. हे चिन्ह इशारा देऊन गेलं, आमची युद्धाची तयारी सुरु झाली आहे. सोशल मीडियाच्या काळात हे चिन्ह घरोघरी पोहोचण्यासाठी वेळ लागणार नाही, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here