कर्जमाफी, दुष्काळ अंमल ,चारा छावण्या व पाणी टँकर सुरू करावे अन्यथा आंदोलन- स्वप्नील खाडे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कर्जमाफी, चारा छावण्या व पाणी टँकर तातडीने सुरू करावे, अन्यथा जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आक्रमक पध्दतीने आंदोलन छेडण्याचा इशारा जामखेड येथिल सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये चाळीस तालुके दुष्काळ जाहिर केले व इतर तालुक्यातून माहिती घेऊन व निवेदने स्विकारून सदृष्य हा शब्द लावून आहे. त्या परिस्थितीमध्ये विषय थांबवला पण जामखेड तालुक्यामध्ये सन २०२३ मध्ये पूर्णः पाऊसकाळ हा कोरडा गेलेला असून थोडाफार पाऊस झाला आहे त्यातच गतवर्षी अवकाळी पावसाचा फटकारा हा बसलेला आहे. एक पिक हंगामी कोठे कोठे आलेले आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात हलक्या सरीचा व मुसळधार पाऊस झाला पण जामखेड तालुक्यातील लघुपाटबंधारे व विविध स्वरूपाचे तलाव, नद्या, नाले यात कसल्याही प्रकारची पाणी पातळी साचलेली नाही.
जामखेड शहरातून वाहणाऱ्या विंचरणा नदीला भुतवडा तलावाच्यावरील बीड जिल्ह्यातील डोंगराळ भागातील पर्जन्य झाल्यामुळे वरचे पाणी खाली वाहून आले त्याने सोशल मिडीयावर कधीतरी पूरस्थिती पहावयास मिळाली होती. अन्यथा जामखेड तालुक्यातील एकाही नदीला पाणी नाही. जमीनीच्या मातीला व शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडलेली आहे. दिवाळीसह सण, उत्सव हालाकीचे झालेले आहेत. त्यातच अवकाळी पाऊस व सततच्या वातावरण बदलाने तोंडाशी आलेला घास गेलेला आहे. जामखेड तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली दबलेला आहे. सतत राजकारणातील बदलामुळे शेतकऱ्यांना शासन दरबरातून प्रचारा दरम्यान लोकप्रतिधिंकडून केलेले घोषवाक्य पूर्ण होताना दिसत नाही व वेगळ्याच वाटचालीकडे जाताना दिसत आहे. त्यामुळे कोणाशी बोलावे व काय बोलावे हे शेतकऱ्यांना समजत नाही. कोणत्याही पिकाला हमीभाव नाही तसेच केलेल्या कष्टाला फळ मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्याची तरूण पिढी शेती कसण्यापासून नको म्हणत आहे. त्याने शेतकऱ्यांचे घर फिरले की, घराचे वासे फिरले हे कळत नाही.
खालील प्रमाणे आपणास मागण्या आहेत त्या सरकारने व प्रशासनाने मान्य कराव्यात.
१) जामखेड तालुका पूर्णतः दुष्काळ जाहिर करण्यात यावा व दुष्काळातील योजना व विमा अंमल करण्यात यावा.
२) जामखेड तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी पाणी टँकर चालू करण्याते यावे.
३) जामखेड तालुक्यामध्ये पशुधन टिकविण्यासाठी जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात.
४) जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.
५) शेतकऱ्यांना शेतीपंपाचे वीजबील माफ करण्यात यावेत.
६)गतवर्षी केलेल्या पिकविमा व अनुदान तातडीने वितरीत करण्यात यावेत तसेच ५५ वय वर्षे वरील शेतकर्यांना १०,०००/- रू. पेंशन सुरू करण्यात यावेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात यावेत.
७)व दुधाला किमान आधारभूत किंमत वर्तमान स्थितीप्रमाणे मिळावे म्हणजे हमीभाव देण्यात यावा.
८) जामखेड तालुक्यातील मुलां-मुलींसाठी शैक्षणिक शुल्क व परीक्षा फी माफ करण्यात यावी. तसेच एस.टी. पासेस मोफत द्यावेत. तरी वरील मागण्या शासन दरबारी मंजूर करून प्रशासनाने सहकार्य करावे. अन्यथा जामखेड शेतकऱ्यांच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा दिला.