बीड जिल्ह्य़ातील स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मारुती पठाडे यांची निवड
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अनेक पतसंस्थांचे अर्थिक गैरप्रकार तसेच विविध कारणांनी भवितव्य धोक्यात येऊन बंद पडत असताना, बीड जिल्ह्यातील शिक्षकांची अदर्श पतसंस्था असलेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्था मर्यादीत कडा ही पतसंस्था १०० टक्के कर्जवसुली असलेली मराठवाडय़ातील एकमेव अशी पतसंस्था असून मुल्यांकन झाल्यास ती महाराष्ट्रातीलही एकमेव पतसंस्था ठरू शकते. अश्या अदर्श पतसंस्था असलेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्था मर्यादीत कडा या संस्थेच्या अध्यक्षपदी आपल्या श्रीकृष्ण काॅलीनीतील रहिवासी असलेले व बीड जिल्ह्य़ातील शिक्षक नेते मारुती पठाडे यांची निवड होणे ही गौरवास्पद बाब आहे. असे गौरवोद्गार जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात व्यक्त केले.
तसेच बाळू जरांडे यांना मिळालेल्या ‘राष्ट्रबांधणीचे शिल्पकार’ या पुरस्काराबद्दल अभिनंदन करताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, संगमनेर येथील इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर ही संस्था लहान मुलांच्या भवितव्यासाठी काम करणारी संस्था आहे. ती संस्था मुलांसाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करत असते. प्राथमिक शिक्षक असलेल्या बाळू जरांडे यांनीही आपल्या कामाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थांच्या उज्वल भविष्यासाठी काम केले आहे. याची दखल घेऊनच सदर संस्थेने त्यांना ‘राष्ट्रबांधणीचे शिल्पकार’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
जामखेड येथील रहिवासी असलेले व आष्टी तालुक्यातील शिक्षक नेते मारुती पठाडे यांची बीड जिल्ह्यातील शिक्षकांची अदर्श पतसंस्था असलेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्था मर्यादीत कडा या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच संगमनेर येथील इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने दिला जाणारा ‘राष्ट्रबांधणीचे शिल्पकार’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जामखेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक बाळू जरांडे या दोन्ही मान्यवरांचा जामखेड येथील श्रीकृष्ण काॅलीनीच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.









