माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर ‘गाव चलो अभिनांतर्गत; पोहचले गावा गावात
जामखेड प्रतिनिधी
‘गाव चलो अभिनांतर्गत; माजी मंत्री आ. प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती साकत परीसरातील दिघोळ व माळेवाडी या गावात देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली.
सध्या संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभिनांतर्गत केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या लोकोपयोगी विविध योजना व विकास कामांनबद्दल दिघोळ व माळेवाडी स्थानिक नागरिक, युवक, महिला, शेतकरी यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय सेवेतील कुटुंबीय, माजी सैनिक, आशा अंगणवाडी सेविका, लाभार्थी व नवमतदार यांच्याशी संवाद साधत माहिती दिली.
हे अभियान राबविताना जनतेच्या मनात भाजप विषयी व पक्षाच्या नेतृत्वा बाबत आस्था व प्रेम निर्माण करण्याचे काम केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ताकदीने उभे रहाण्याचे अवहान माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांनी केले. या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांनी दिली.
यावेळी सरपंच पिराजी दगडे, उपसरपंच बळीराम तागड, मच्छिंद्र गीते (चेअरमन) अरुण गवळी, गहिनीनाथ गीते, (माजी सरपंच) जेष्ठ नेते लक्ष्मण माने, सुरेश गीते, आशोक गीते, पाठक आप्पा, विठ्ठल विधाते, शिवाजी गीते, संदीप गीते, भाऊसाहेब आवारे, रंगनाथ आवारे, भिमराव विधाते, अमोल गीते, दशरथ राजगुरू, नागराज मुरुमकर, सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here