मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या जामखेड बंदला उस्फुर्त प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने काल महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याच आनुशंगाने जामखेड मध्ये मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने देखील बंद ची घोषणा करण्यात आली होती. या बंदला जामखेड मधिल सर्व व्यापारी बांधवांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून सर्व व्यापाऱ्यांनी आपली बाजारपेठेमधील दुकाने बंद ठेवली होती.
जामखेड शहरातील सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. याबाबत मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला जामखेड शहरासह आनेक गावांनी उत्फुर्त प्रतिसाद देत आनेक गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. दरम्यान जामखेड शहरातील मुख्य बाजारपेठ आसलेल्या मेन रोड, तपनेश्वर रोड, जयहिंद चौक खर्डा चौक, नगररोड, बीड रोड व बसस्थानक परिसरातील दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे. जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा, तेलंगशी, देवदैठण, सह सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर कुठलही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीसांन कडुन बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here