रोखठोक अहमदनगर…..

राज्यात करोनाची संख्या वाढत चालली असून याच अनुषंगाने सुरक्षेच्या कारणास्तव अहमदनगर मध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत दुकाने सुरू राहणार आहेत. याबाबत २९ जानेवारीला दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कायम राहणार आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंगल कार्लयांवर कारवाई करून पहिल्यांदा गर्दी नियंत्रणात आणली आहे. त्यानंतर २९ जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. त्यानुसार यंत्रणांना कारवाईचा आदेश दिला आहे.

अ) सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील.

ब) अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींच्या हालचालींवर | फिरण्यावर रात्री 10.00 ते सकाळी 5.00 या कालावधीत निबंध राहील. दुकान सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत खुली राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here