जामखेड येथे वाल्मिक आण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
अनिलभाऊ पवार मित्र मंडळाच्या वतीने केले होते कार्यक्रमाचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
परळी येथील माजी नगराध्यक्ष तथा कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक आण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे अनिल पवार मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जामखेड शहरात आगमन होताच खर्डा चौक व बीड कॉर्नर या ठिकाणी वाल्मिक आण्णा कराड यांचे जेसीबी च्या सहाय्याने फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक आण्णा कराड यांचा वाढदिवस जामखेड येथील विश्रामगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाल्मिक आण्णा कराड यांचे दुपारी जामखेड शहरात वाजत गाजत भव्य व जेसीबी च्या सहाय्याने फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले. विषेश म्हणजे आण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती या ठीकाणाहुन मोठा केक तयार करुन आणला होता व हाच केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी बार्शी येथील भगवंत ब्लड बँक यांच्या सहकार्याने व अनिलभाऊ मित्र मंडळाच्या वतीने भव्य आसे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भगवंत ब्लड बँकेचे डॉ गणेश जगदाळे व त्यांच्या समवेत आलेल्या सहकार्यांनी रक्त संकलन केले. या रक्तदान शिबिरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ५१ कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. निवारा बालगृह या ठीकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिष्टान्न भोजन देण्यात आले. 
यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, अमित जाधव, सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार, गुलशन अंधारे, भिम टोला चे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड, वसीमभाई बिल्डर , डॉ कैलास हजारे, माजी ग्रा. सदस्य जाकीर सय्यद, विशाल पवार, समिर चंदन, गणेश डोंगरे, सुरज जाधव, ॲड. हर्षल डोके, ॲड प्रविण सानप, अक्षय उर्फ चिंगु मोरे, हर्षद मुळे, सुरज जाधव, विनायक राळेभात, मिथुन जाधव, संतोष पवार, संतोष गव्हाळे, सनी सदाफुले, राणा सदाफुले, शुभम जाधव सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास हजारे यांनी केले तर आभार अमित जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here