जामखेड येथे सकल हिंदू समाज्याकडुन निवारा बालगृहात महाप्रसादाचे वाटप
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथिल सकल हिंदू समाज्याकडु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच बीड कॉर्नर याठिकाणी श्री राममूर्ती चे पूजन केले तसेच राम मंदिर सोहळ्याची थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले व आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात वातावरण राममय झालेले होते. सकल हिंदू समाज यांच्या कडून बीड रोड कॉर्नर येथे सकल हिंदू समाज यांच्या वतीने श्री राममूर्ती चे पूजन केले तसेच राम मंदिर सोहळ्याची थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले व आनंद उत्सव साजरा केला. तसेच श्री राम मंदिर प्रतिकृती हा आकर्षक देखावा व आकर्षक विद्युत रोषणाई नेत्र दीपक फटाक्यांची आतषबाजी वाद्य व ध्वनी यंत्रणेतून प्रभू श्रीरामांचा जयजयकार करण्यात आला व महाप्रसाद अकरा हजार लाडूंचे वाटप केले व निवारा बालगृह या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आली कार्यक्रमासाठी सर्व राम भक्त सर्व व्यापारी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.