चांगल्या कामासाठी योगदान दिले तर समाधान मिळते – पो.नि.महेश पाटील
निवारा बालगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा बाल महोत्सव साजरा.
जामखेड (प्रतिनिधी)
निवारा बालगृहाचे सामाजिक काम खुप मोठे आहे. ॲड आरुण जाधव हे सामाजिक कामातुन वंचितांची सेवा करतात. त्यामुळे माझी काही मदत लागली तर मी नक्कीच करेल कारणं चांगल्या कामासाठी योगदान दिले तर केली तर त्यामधून समाधान मिळते आसे मत जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी व्यक्त केले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निवारा बालगृह या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील सर्व शाळांमधून विविध स्पर्धेचे आयोजन करून स्पर्धकांना बोलावुन निवारा बालगृह मोहाफाटा (समता भूमी) ता- जामखेड याठिकाणी निवारा बाल महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह आयोजित बाल-महोत्सव ज्योती क्रांती पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. आजिनाथ हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, उद्योजक सुदाम वायकर, ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ, सचिवा उमाताई जाधव, अधिक्षक वैजीनाथ केसकर, सिने अभिनेता सचिन चव्हाण, बालमहोत्सवाचे प्रमुख आकर्षण शिवम इंगळे, द्वारका ताई पवार, यावेळी आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने गेली पंधरा दिवसापासून जामखेड तालुक्यातील अनेक शाळान मधील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करून या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कबड्डी, निबंध, सुंदर हस्ताक्षर व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अनोखा असा उपक्रम चालू केल्याबद्दल जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी कबड्डी, खो-खो स्पर्धेसाठी उपस्थित राहून आयोजकांचे मोठे कौतुक केले, या सर्व स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे नंदकुमार गाडे, तुकाराम शिंदे, दादासाहेब पुलवळे, ऋषिकेश गायकवाड, रंजनी बागवान, राजु शिंदे, आदींनी परिश्रम घेतले, यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की संस्थेचे काम हे अगदी तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी खूप मोठे आहे, म्हणून माणूस स्वतःसाठी जगला तर तो मेलेला असतो, परंतु दुसऱ्यासाठी जगला तर तो जिवंत असतो या पद्धतीने ॲड. डॉ. अरूण (आबा) जाधव यांचं व त्यांच्या संस्थेचे खूप मोठं काम आहे, पुढील काळामध्ये देखील कोणत्याही स्पर्धेच्या आयोजनासाठी माझी काही मदत लागली तर नक्कीचं आवाज द्यावा, त्यासाठी मी तुम्हाला ज्या साधन सामुग्रीची गरज लागेल त्यासाठी नक्कीचं मदत करेल, कारणं चांगल्या कामासाठी योगदान दिले तर केली तर त्यामधून आनंद खुप मोठा मिळतो
ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की व्यवस्थेने नाकारलेल्या माणसाच्या लढ्याचे नेतृत्व मी करतो वंचित, निराधार, अनाथ आदिवासी, भटके विमुक्त त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवारा बालगृहाची स्थापना केली आहे, या निवारा बालगृहाच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये पुढील काळामध्ये संस्था उल्लेखनीय काम करणार आहे असे त्यांनी सांगितले आणि हे बालगृह समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरचं चालविले जाते याला शासनाचे कुठलेही अनुदान नाही असे ते म्हणाले. 
वरील स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस देणारे दानशूर व्यक्ती मोहो गावचे सरपंच भीमराव कापसे, सुदाम वायकर, भगवान गिरी, महोन शिंदे, उद्योजक अनिल (दादा) पवार, बाळासाहेब नाईकनवरे, अनिल सावंत, अमोल सातपुते श्रीकृष्ण अटक, काशिनाथ वायकर, दौलत साळवे, दादा शिंदे व दुर्गा मोबाईल शॉप जामखेड आदी मान्यवरांनी विजेत्यांचे बक्षीस देऊन त्यांच्या कलेला मोठा वाव देण्याचे काम केले आहे.
भारतीय संविधानाच्या उद्देशीकेस पुष्पहार अर्पण करून निवारा बाल-महोत्सवाचे उद्घाटन केले,व विद्यार्थ्यांनीही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला, यावेळी संस्थेची प्रास्ताविक संचालक बापूसाहेब ओहोळ यांनी केले, संतोष चव्हाण सर यांनी सूत्रसंचालन केले, व सचिन भिंगारदिवे यांनी आभार मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल पवार, लता सावंत, तुकाराम पवार, शहानुर काळे, आलेश शिंदे, काजोरी पवार, ऋषिकेश गायकवाड, रजनी औटी, राहुल पवार, दिपाली काळे, शुभांगी गोईर, रोहिणी राऊत, राजू शिंदे, अर्चना भैलुमे, नरशिंग भोसले, आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here