
बीजेस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नंदकिशोर साखला व राज्य सचिव दिपक चोपडा यांचा तीन दिवस अहमदनगर दौरा
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष अमोल तातेड व जिल्हा सचिव प्रफुल्ल सोळंकी यांचे आवहान
जामखेड प्रतिनिधी
बीजेस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नंदकिशोर साखला तथा राज्य सचिव दिपक चोपडा यांचा महाराष्ट्र राज्य अधिवेशन २०२४ च्या अनुषंगाने उद्या पासून तीन दिवस अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. आशी माहिती दक्षिण जिल्हा अध्यक्ष अमोल तातेड व जिल्हा सचिव प्रफुल्ल सोळंकी यांनी दिली.
यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सभा होणार असुन या मध्ये उद्या मंगळवार दि २३ जानेवारी रोजी कोपरगाव, शिर्डी, राहता, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव व पाथर्डी असा दौरा असुन बुधवार दि २४ जानेवारी २०२४ रोजी तिसगाव, घोडेगाव, सोनई, वांबोरी, राहुरी, कोल्हार, लोणी, व आश्वी तसेच गुरवार दि २५ जानेवारी २०२४ रोजी कडा, आष्टी, जामखेड, मिरजगाव, कर्जत व श्रीगोंदा असा एकुण तीन दिवस अहमदनगर जिल्ह्यात दौरा असणार आहे.

भारतीय जैन संघटनेचे वर्तमान राज्य अध्यक्ष आगामी राष्ट्रीय अध्यक्ष श्री नंदकिशोर जी साकला नाशिक राज्य सचिव श्री दीपक जी चोपडा नाशिक यांचा अहमदनगर जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. आपण सर्वांनी आपल्या शहरात जादा संख्येने उपस्थित राहून आपल्या सूचना किंवा सुजाव त्यांना देणे आहे. तसेच त्यांच्या दौऱ्याचे कारण म्हणजे येणारे आगामी राज्य अधिवेशन चे निमंत्रण अधिवेशन मध्ये दिलेल्या आपल्या सूचना किंवा सुचव यावर मंथन सेवक निर्णय संघटनेद्वारे नवीन प्रोजेक्टवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन व नवयुवकांनी जास्तीत जास्त संघटनेमध्ये सहभागी व्हावे आसे अवहान दक्षिण जिल्हा अध्यक्ष अमोल तातेड व जिल्हा सचिव प्रफुल्ल सोळंकी यांनी केले आहे.


Post Views: 26
error: Content is protected !!