जामखेड तालुक्यातून २०० स्वयंसेवक व हजारो मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटिल यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नगरकडे रवाना .
मोर्चासाठी भाकरी, कोरडा शिधा व पाणी बॉटल सह मिळाला विविध स्वरूपात मदतीचा हात.
जामखेड प्रतिनिधी
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मागील तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली होती त्या हाकेला प्रतिसाद देत संपुर्ण राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने झाली. मात्र तरी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. या अनुशंगाने सरकारने सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी लाखो समाज बांधवांच्यासह मुंबईकडे कुच केली आहे. कालचा मुक्काम मातोरी येथे होता तर आजचा मुक्काम नगर जिल्ह्यातील बाराबाभळी याठिकाणी होत आहे. या ठिकाणी लाखो मराठा बांधव मुक्कामासाठी थांबणार आहेत. याच पाश्र्वभूमीवर जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबई मोर्चासाठी मदतीची हाक दिली होती त्यास तालुक्यातील सर्व बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणावर कोरडा शिधा, भाकरी, ठेचा, लोणचे, चिवडा, लाडु, रेवडी फुटाणे यासह पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स अशा स्वरूपात मदत केली.










