छत्रपती संभाजी महाराजांच्या कामगिरीचा आदर्श घेऊन तरूणांनी परिवर्तनाची लढाई लढली पाहिजे- प्रा. मधुकर राळेभात
जामखेड येथे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा
जामखेड प्रतिनिधी
स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज हे अपराजित योध्दा होते. त्यांनी स्वराज्यसाठी लढलेल्या सर्व लढाया जिंकल्या होत्या. त्यांचा या अपराजित कामगिरीचा आदर्श घेऊन तरूणांनी आपल्या जीवनात परिवर्तनाची लढाई लढली पाहिजे. तसेच मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे यांच्या अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.
राज्यस्तरीय शिक्षा भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. मधुकर राळेभात मित्र मंडळाच्या वतीने प्रा. विकी घायतडक यांच्या नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब देशपांडे, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. अरूण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, नगर परिषदेचे माजी सभापती मोहन पवार, मजूर फेडरेशनचे संचालक प्रकाश सदाफुले, गुलाब जांभळे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते शहाजी डोके, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रा. कुंडल राळेभात, मौलाना खलील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, माजी नगरसेवक पवन राळेभात, अमित जाधव, प्रवीण उगले,
विकास मासाळ, भिम टोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, संतोष गव्हाळे, राहुल अहिरे, अशोक आव्हाड, विशाल अब्दुले, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, नामदेव राळेभात, रूपेश निकाळजे, हभप नन्नवरे महाराज, हरिभाऊ आजबे, अमोल गिरमे, नरेंद्र जाधव, बिभीषण धनवडे, इस्माईल सय्यद, मुक्तार सय्यद, ॲड. हर्षल डोके, ॲड. बाळासाहेब घोडेस्वार, समीर पठाण सह सुनिताताई मधुकर राळेभात, बौद्ध महासभेच्या सुरेखा सदाफुले, जया जाधव, आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.