कर्जत जामखेडची मुळ व्याधी पण काढुन टाका – आ. प्रा राम शिंदे
आ. प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुळव्याध शिबिर संपन्न, ४५० रुगांची केली मोफत तपासणी
जामखेड प्रतिनिधी
माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही मुळव्याध शिबिराचे आयोजन केले या बद्दल मी आपला ऋणी आहे. मात्र या मुळव्याधा बरोबरच कर्जत जामखेडची मुळ व्याधी देखील काढुन टाका म्हणजे पुढे याचा कोणाला त्रास होणार नाही असा टोला आ. प्रा राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांना त्यांचे नाव न घेता लावला. या शिबिरात एकुण ४५० रुग्णांनी मोफत तपासणी केली.
आ. प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा युवा नेते प्रविण बोलभट, आण्णा ढवळे, विष्णु गंभीरे यांच्या वतीने व समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या सहकार्याने मोफत मुळव्याध शिबीर आयोजीत केले होते. शिबिराचे उद्घाटन आ. प्रा राम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या मुळव्याध उपचार शिबिरात नगर येथील प्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉ प्रदिप तुपेरे व डॉक्टर समुद्र यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली.
प्रसंगी उपस्थित सभापती पै. शरद दादा कार्ले, ता अध्यक्ष मा अजय दादा काशिद, शिवसेना ता अध्यक्ष प्रा कैलास माने, प्रविनशेठ चोरडीया, रवीदादा सुरवसे, संभाजी ब्रिगेडचे नेते आण्णासाहेब सावंत, बिभिषण (मामा) धनवडे, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, शाकिर खान, सोमनाथ राळेभात, लना होशिंग विद्यालयाचे प्रचार्य होशिंग सर, आभिजीत राळेभात, केशव आण्णा वनवे, प्रदिप बोलभट, बाळासाहेब गिते, संजय आबा गोपाळघरे, उद्धव चेअरमन, काका चव्हान, लहु शिंदे, पांडुरंग माने, संजय राऊत, डॉ सचिन घायतडक, सलीम तांबोळी, विक्रांत घायतडक, मोहन देवकाते, शिवकुमार डोंगरे, बिटटु मोरे, दादा महारनवर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. प्रा राम शिंदे म्हणाले की नगर येथील प्रसिद्ध डॉ प्रदिप तुपेरे हे मुळव्याधाचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यामुळे आता रुग्णांना संभाजीनगर या ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथे मुळव्याध शिबिर घेतले डॉक्टर या रुग्णांवर मुळव्याधाचे ऑपरेशन करून मुळव्याध काढुन टाकतील त्याच प्रमाणे कर्जत जामखेडच्या देखील मुळ व्याधीवर उपचार झाले पाहिजेत आणि ही मुळ व्याधी कायमची घातली पाहिजे त्यामुळे पुन्हा ही व्याधी येणार नाही असा टोला आ. प्रा राम शिंदे यांनी आ. रोहित पवारांना त्यांचे नाव न घेता लावला.
माझ्या वाढदिवसानिमित्त हे मुळव्याध शिबिर घेतले त्यांना समर्थ हॉस्पिटल चे संचालक डॉ.भरत दारकुंडे यांनी सहकार्य केले त्या बद्दल मी धन्यवाद देतो. तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक भावनेतून कल्पना मांडणे आणि ती अस्तित्वात आनणे व आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वाढदिवसाचा मुख्य हेतु साध्य झाला याचे मला समाधान आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जाकिर शेख सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here