जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्षपदी डॉ. सिताराम ससाणे तर सचिवपदी डॉ. सादेख पठाण यांची बिनविरोध निवड
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्सना येणाऱ्या विविध अडचणी व तालुक्यातील विविध समाज घटकातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी तालुक्यातील काही सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या काही डॉक्टर्स मंडळींनी एकत्र येत जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन या संघटनेची नुकतीच संघटनेची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणीकृत या संघटनेची प्रथमच कार्यकारणी नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार अध्यक्षपदी डॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्षपदी डॉ. सिताराम ससाणे तर सचिवपदी डॉ. सादेख पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील डॉक्टरांना आपला व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी निवड करण्यात आलेली कार्यकारणी अध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. सिताराम ससाणे सचिव डॉ. सादेख पठाण, उपाध्यक्ष (महिला) डॉ. विशाखा देवकर, कोषाध्यक्ष डॉ. चंद्रकिरण भोसले, कार्यकारी सदस्य डॉ. सुशिल पन्हाळकर, कार्यकारी सदस्य डॉ. विकी दळवी या सर्वांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या वेळी पत्रकार दिन व डॉक्टर असोशिएशन कार्यकारिणी निवडीचे औचित्य साधून जामखेड तालुका डॉक्टर्स असोशिएशन संघटनेच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ गायकवाड म्हणाले की आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी आई वडिलांनी मोठे कष्ट घेतलेले आसतात त्यामुळे त्यामुळे त्यांचे स्वप्न पुर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच ते पुर्ण झाल्यावर आपण समाजासाठी काहीतरी कार्य करणे ही पण आपली बांधिलकी आहे याच भावनेतून ही संघटना स्थापन केली आहे हे सामाजिक काम करण्यासाठी पत्रकार बांधव हा महत्त्वाचा दुवा आहे आमच्या संघटनेतील प्रत्येक सदस्य हा याच भावनेतून यापुढे काम करणार आसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान पत्रकारांच्या वतीनेही वसंत सानप, फय्याकभाई सय्यद, प्रकाश खंडागळे, संजय वारभोग, संतोष थोरत यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आबेद जमादार तर सुत्रसंचलन डॉ. सादीक पठाण यांनी केले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्येने डॉक्टर व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.










