राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुल आयोजित रक्तदान शिबीरात १२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
जामखेड प्रतिनिधी
गेल्या नऊ वर्षापासून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मंगेश (दादा) आजबे हे रक्तदान शिबीर आयोजित करतात. याला ग्रामीण भागासह शहरातील तरूण वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांच्या जयंतीनिमित्त निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १२१ रक्तदात्यांनी रक्तदान करून जिजाऊंना मानवंदना अर्पण केली.
शंभूराजे कुस्ती संकुल व सुरभी ब्लड बँक अहमदनगर यांच्या वतीने काल दि १२ रोजी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी मोठ्या संख्येने तरुण वर्ग व शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरणारे तसेच अनेक सामाजिक कामात पुढाकार घेणारे शंभूराजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी जामखेड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यात शेतकरी तरूण वर्ग अशा १२१ जणांनी रक्तदान केले. यात महिलांनी देखील सहभाग घेतला होता.
स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ ( मॉसाहेब) यांच्या जयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुलचे प्रमुख मंगेश (दादा) आजबे यांच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी जामखेड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सकाळ पासून सायंकाळ सात वाजेपर्यंत रक्तदान शिबीर सुरू होते.
रक्ताचा थेंब कोणाचा तरी जीव वाचवू शकतो आधुनिक काळात रक्ताची नितांत गरज असते हे ओळखून शंभूराजे कुस्ती संकुलाच्या माध्यमातून मंगेश आजबे यांनी गेल्या नऊ वर्षापासून राजमाता जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेत आहेत हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.
यावेळी बोलताना मंगेश (दादा) आजबे म्हणाले की, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. शुक्रवार दि. १२ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शंभूराजे कुस्ती संकुल च्या वतीने मंगेश कन्ट्रक्शन ऑफीस शेजारी नगर रोड जामखेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.