जामखेडमध्ये कॉलेजला शिकणाऱ्या ११ वी च्या विद्यार्थ्यांनीची गळफास घेऊन आत्महत्या
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील सदाफुलेवस्ती येथील अश्विनी आण्णा नेमाने (वय १७ ) या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अश्विनी नेमाने हि शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत आहे. आई वडील जामखेड शहरातील एका वीटभट्टीवर कामाला असतात सकाळी दोघेही कामाला गेले असताना अश्विनी कॉलेजला गेली कॉलेज सुटल्यावर घरी आली घरातील घरकाम केले व नंतर घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सायंकाळी आई वडील घरी आल्यावर ही घटना लक्षात आली तेव्हा ताबडतोब ग्रामीण रुग्णालय दाखल केले पण तोपर्यंत ती मयत झाली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. घटना समजताच पोलीस निरीक्षक महेश पाटील घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जामखेड चे वैद्यकीय अधिकारी शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here