राजमाता जिजाऊ जन्म उत्सव सोहळा व मंबई येथिल मोर्चाच्या आनुशंगाने नियोजन बैठकीचे आयोजन.
जामखेड तालुक्यातील हजारो मराठा बांधवांनी नियोजन बैठकीस उपस्थित होण्याचे आवाहन
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने व मुंबई येथे निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या आनुशंगाने शुक्रवार दि १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साई गार्डन,नगर रोड,जामखेड येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास व बैठकीस तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी उपस्थीत रहाण्याचे अवहान मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती उत्सव झाल्या नंतर याच ठिकाणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या मंबई येथील आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठक संपल्या नंतर मराठा बांधवांसाठी स्नेह भोजनाची सोय करण्यात आली आहे.
मुंबई येथील आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दि १७ जानेवारी पर्यंत जामखेड तालुक्यातील विविध गावात मॅरेथॉन बैठका घेऊन पुढील आंदोलना विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा बीड जिल्ह्यातील गेवराई मार्गे नगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पदयात्रा नगर शहरात एक दिवस मुक्कामी राहणार आहे. पदयात्रेत सहभागी असलेल्या मराठा बांधवांची भोजन, पिण्याचे पाणी आणि राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यातील मराठा बांधव मदत करणार आहे. जामखेड तालुक्यातून देखील मदत व २०० स्वयंसेवक पदयात्रेसाठी सेवा करणार असल्याचे सांगण्यात आले.जामखेड तालुक्यातील समाज बांधव नगर येथे पदयात्रेत सामील होणार आहेत.या बैठकीला तालुक्यातील हजारो मराठा बांधवांनी उपस्थीत रहाण्याचे अवहान मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने आयोजकांन कडुन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here