

१०४ वर्षांच्या आजीबाई ने केली अर्धांगवायु वर मात
कोरोना काळात १०२ वय आसताना या आजिबाईंनी कोरोनावर देखील केली होती मात
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील सारोळा येथिल चंपाबाई तुकाराम मुळे वय १०४ वर्षे यांना नुकताच अर्धांगवायु चा झटका आला होता. त्यांना तातडीने जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आखेर डॉक्टरांच्या पाच दिवसाच्या प्रयत्ना नंतर या आजीबाईंनी या अर्धांगवायु वर मात केली. कोरोना काळात १०२ वय आसतानाही या आजिबाईंनी कोरोनावर देखील मात केली होती.

घरात आजी-आजोबा असले की, घर अगदी परिपूर्ण वाटतं. त्यांच्या नुसत्या असण्यानेच प्रचंड आधार मिळतो. ते आपल्याला 100 वर्ष जग, असा आशीर्वाद देतात. आपल्याला मात्र त्यांनी वर्षनुवर्षे आपल्यासोबत असावं असं वाटतं. ते लोक खरंच खूप नशीबवान असतात, ज्यांना दीर्घायुष्यासाठी आजी-आजोबांचा सहवास मिळतो.

अशाच एक आजीबाई आहेत जामखेड तालुक्यातील सारोळा या ठिकाणी रहातात त्यांचे वय सध्या १०४ वर्षे आहे. चंपाबाई तुकाराम मुळे असे या आजिबाईंचे नाव आहे. मात्र दि ५ जानेवारी रोजी गावातील सप्ताह संपल्या नंतर त्या घरी आल्यावर त्यांना अस्वस्थ वाटु लागले होते. त्यांची डावी बाजु जड झाली होती. त्यामुळे तातडीने त्यांचा मुलगा आशोक मुळे यांनी त्यांना तातडीने जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी उपचारांसाठी दाखल केले होते.

समर्थ हॉस्पिटल मध्ये त्यांचे सीटीस्कॉन केल्या नंतर त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याचे व त्यांना अर्धांगवायु चा झटका आला असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यानंतर त्यांच्यावर समर्थ हॉस्पिटल येथे डॉक्टर भरत दारकुंडे , डॉ .अमोल भगत व श्रीनिवास लांब यांनी यशस्वी उपचार केले व आजिबाईंनी देखील उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. यानंतर त्यांना दि १० जानेवारी रोजी घरी सोडण्यात आले आसुन त्यांची तब्येत सध्या ठणठणीत आहे. या नंतर नातेवाईकांनी देखील समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आशा पद्धतीने १०४ वर्षे असतानाही या आजिबाईंनी अर्धांगवायु सारख्या गंभीर अजारानवर मात केली आहे.

कोरोनाच्या दुसर्या लाटेत देखील या आजिबाईंचे वय १०२ वर्षे होते. त्यांच्यावर दोन वर्षांपुर्वी आरोळे कोवीड सेंटर येथे पाच दिवस उपचार केले होते. त्या मध्ये त्यांनी कोरोना सारख्या गंभीर अजारानवर मात करून कोरोनाला हरवले होते. आणि पुन्हा १०४ वर्षे असतानाही अर्धांगवायु वर मात केली आहे.






