हिट ॲण्ड रन कायद्या विरोधात जामखेड येथिल रीक्षा चालक मालक ठेवणार दोन दिवस रीक्षा बंद
जामखेड परिवाहन ड्रायव्हर असोशिएशनच्या वतीने उद्या खर्डा चौकात रास्तारोको आंदोलन
जामखेड प्रतिनिधी
केंद्र सरकार ने लागु केलेल्या हिट ॲण्ड रन या कायद्या विरोधात जामखेड येथिल रिक्षा चालक-मालक सेवाभावी संस्था जामखेड यांच्या वतीने दोन दिवस रीक्षा बंद ठेऊन सरकारचा निषेध केला आहे. या बाबत नुकतेच जामखेड चे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच जामखेड परिवाहन ड्रायव्हर असोशिएशनच्या वतीने उद्या दि १० रोजी खर्डा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या बाबत तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्र सरकारने हिट अ‍ॅण्ड रन हा
कायदा देशातील सर्व वाहनासाठी लागु केला आहे. त्याच्या अटी व नियम जाचक असुन त्यामध्ये वाहन चालकाकडून अपघात झाल्या नंतर तो पळुन गेल्यास ७ लाख रूपये किंवा १० वर्ष तुरूंगवास असा कायदा केला आहे. त्यामुळे अनेक तरूण युवक या व्यवसायकडे किंवा नोकरीकडे येणार नाहीत. यामुळे आणखी बेरोजगारी वाढेल या कायदयातील जाचक नियम शिथील करण्यासाठी तसेच केलेल्या या कायद्याच्या निषेधार्थ जामखेड तालुक्यातील सर्व रिक्षा दि.१० जानेवारी २०२४ व दि.११ जानेवारी २०२४ रोजी आशा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. या निवेदनावर रीक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अमित चिंतामणी व उपाध्यक्ष असिफ जमशेद सय्यद यांच्या सह्य़ा आहेत.
परिवहन ड्रायव्हर असोशिएशन जामखेड च्या वतीने देखील हिट ॲण्ड रन कायद्याच्या विरोधात उद्या दि १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी खर्डा चौक या ठीकाणी रास्तारोको आंदोलनात करण्यात येणार आहे. या बाबत चे निवेदन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चालकांसाठी लागु करण्यात आलेल्या हिट ॲण्ड रन कायद्या विरोधात दि १० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता खर्डा चौक येथे चार चाकी वाहणांसह रस्ता रोको करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्व तालुक्यात स्टेरिंग छोड़ो आदोंलन करण्यात येणार असुन. जो पर्यंत सरकार हा कायदा मागे घेत नाही तो पर्यंत वहानांचा बेमुदत बंद सुरुच राहील रहाणार आहे आसे देखील निवेदनात म्हटले आहे. तरी या रास्तारोको आंदोलनात तालुक्यातील सर्व वहान चालक मालकांनी सहभागी होण्याचे आवाहन परिवहन ड्रायव्हर असोशिएशन जामखेड च्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here