रोखठोक कर्जत……
भक्ती बरोबर विचारांची शक्ती आणि उपस्थित असणारी लोकशक्ती यांना साक्षी ठेवून मतदारसंघात विकासाचे काम करायचे आहे. आपल्याला आगामी काळात फक्त विकासाचे आणि विकासाचेच राजकारण करायचे आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कर्जत तालुक्यासाठी हक्काचे ५० बसेस उपलब्ध होणार असून यापुढे एसटी नसल्याने मतदारसंघातील कोणाला शिक्षण सोडावे लागणार नाही असे प्रतिपादन आ रोहित पवार यांनी केले ते कर्जत बसस्थानक परिसरात ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज रथ व रथोत्सव प्रतिकृती लोकार्पण व कर्जत बस डेपो आगाराच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी बारामती ऍग्रोचे विश्वस्त राजेंद्र पवार, सौ. सुनंदा पवार, सुभाष गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, शाम कानगुडे, विश्वस्त मेघराज पाटील, पुजारी पंढरीनाथ काकडे यांच्यासह रथोत्सव पुजारी, मानकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.पवार म्हणाले की, कर्जतचे ग्रामदैवत सदगुरू गोदड महाराज यांचा रथोत्सव आणि शहराचा अध्यात्मिकतेचा वारसा जगासमोर आणण्याचे प्रयत्न आजच्या लोकार्पण सोहळ्याद्वारे करण्यात आला. आज पाऊस पडला या सुंदर सोहळ्यास संत श्री सदगुरु गोदड महाराजाचा आशीर्वाद देखील मिळाला. राजकारणात शब्द देऊन तो पूर्ण करण्याचा आमच्या सर्वाचा प्रयत्न राहील. आगामी दिवसात ५० बसेस कर्जतसाठी मिळणार असून त्यावर कर्जत आगाराचे नाव असणार आहे. कर्जतला हक्काच्या एसटी बसेस नसल्याने अनेकांनी शिक्षण सोडल्याची भावना आपल्याकडे व्यक्त झाली होती. यासह निवडणुकी काळात विद्यार्थीनीनी कर्जतसाठी आगार असावे अशी अपेक्षा आणि मागणी केली होती आज त्यांची अपेक्षा पूर्ण झाली असे मला वाटते. आता बसेस नसल्याने कोणाचे शिक्षण अर्धवट थांबणार नाही. तालुक्यातील अनेक रस्त्याचे काम पूर्णत्वास लागले आहे. लवकर ही सर्व कामे मार्गी लागणार आहे. कर्जतसाठी लवकरच एमआयडीसी मिळणार असल्याचे पवार यांनी आश्वासन दिले. सीना आणि कुकडी चारीचे कामे सुद्धा सुरू आहे आगामी काळात ही कामे सुद्धा प्राधान्याने पूर्ण केली जातील.
यावेळी विभाग नियंत्रक विजय गीते म्हणाले की, सर्वाधिक विद्यार्थीवर्ग कर्जत तालुक्यातील एसटीने प्रवास करीत आहे. कर्जत आगाराने त्यामध्ये आणखी वाढ होणार आहे. आज राज्यातील २५१ आगाराचे भूमिपूजन आ पवार यांच्या हस्ते पार पाडले याचा अभिमान आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, बबन नेवसे, भालचंद्र कुलथे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विशाल मेहत्रे यांनी केले. तर आभार विजय गीते यांनी मानले. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, सार्वजनिक बांधकामचे अमित निमकर, के के थोरात कन्स्ट्रक्शनचे प्रशांत फलके, बापूसाहेब नेटके, मनीषा सोनमाली, शबनम इनामदार, शीतल धांडे, स्वाती पाटील, अशोक जायभाय, सुनील शेलार, नाना निकत, यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.






