पत्रकारांनी आरोग्य सांभाळून पत्रकारीता केली पाहिजे – जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले

जामखेडच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केला पत्रकारांचा सन्मान.

जामखेड प्रतिनिधी

बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे. लाखो तरुण तरुणी ब्लॉगिंग, वेबसाइट्स आणि युट्युब चॅनेलहून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे, समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. पत्रकारांनी आरोग्य सांभाळून काम केले पाहिजे. आसे मत प्रहार जनशक्ती चे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले यांनी व्यक्त केले.

६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त जामखेड येथील लोकमान्य वाचनालय येथे जामखेड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मराठी पत्रकार दिन मोठ्या साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे होते. यावेळी तालुक्यातील आनेक पत्रकार उपस्थित होते.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, जवळा जिल्हा परिषद गट अध्यक्ष राहुल भालेराव, तालुका संघटक भिमराव पाटील, दिव्यांग सेल जिल्हा उपाध्यक्ष संदीप भुजबळ, दिव्यांग सेल तालुका अध्यक्ष सचिव सचिन उगले, दिव्यांग सेल जिल्हा सचिव संजय मोरे, आंकुश राळेभात, मिलिंद सदाफुले, रत्नापूर अध्यक्ष भोसले मच्छिंद्र, अशोक वायकर, वारे मॅडम उपाध्यक्ष, महिला शहराध्यक्ष शबनम शेख, चित्रा शिंदे. सोमनाथ शिरसागर, धर्मेंद्र लोंढे, सरफराज तांबोळी व प्रहार संघटनचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, यांनी बोलताना सांगितले की जामखेड तालुक्यातील पत्रकार हे वेळोवेळी आपंग शेतकरी कष्टकरी व मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आसतता, पत्रकारांना कुठलेही मानधन नसते तरी देखील ते समाज्याची सेवा करतात. विषेश म्हणजे पत्रकार हा समाज्याचा आरसा आसतो त्यामुळेच आम्ही या पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार केला याचे आम्हाला समाधान वाटते.

यानंतर भिमराव पाटील पत्रकार आशोक वीर, पत्रकार प्रकाश खंडागळे यांच्या सह आनेक पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here