
पत्रकार लोकशाहीच्या स्तंभाची सेवा करतो – प्रा. मधुकर (आबा) राळेभात
राजेंद्र पवार मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार दिन साजरा
जामखेड प्रतिनिधी
पत्रकारला शासनाकडून मानधन दिले पाहिजे, जनतेचे मत पत्रकार व्यक्त करत आसतो, लोकांच्या संरक्षणाचे काम पत्रकार लेखणीतून करत आसतो. तसेच पत्रकार लोकशाहीच्या स्तंभाची सेवा करत आसतो आसे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त नुकताच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या वेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र पवार माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, डॉक्टर चंद्रशेखर नरसाळे, दत्तात्रय सोले पाटील, बापुसाहेब शिंदे, बाळासाहेब आजबे, डॉ. कैलास हजारे प्रा. लक्ष्मण ढेपे, वसीम सय्यद, प्रकाश सदाफुले, वैजीनाथ पोले, गणेश घायतडक, गणेश डोके, रोहन पवार, सचिन भोरे, ससाणे साहेब यांच्या सह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

पत्रकार ही लोकशाहीची गरज आहे. पत्रकार संरक्षणाचा विषय आहे. असे असताना पत्रकार समाजाचे संरक्षण करत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण समाजात एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडून न्याय मिळवून देणे म्हणजे समाजाचे संरक्षण करणे हे होय. आणि ते काम पत्रकार करत आहेत.
आजच्या काळात जरी पत्रकारांची संख्या वाढली असली तरी माध्यमांचे प्रकारही वाढलेले आहेत आपल्या भागातील पत्रकारीता चांगली असून, पत्रकार, समाज, पुढारी व अधिकारी यांची चांगली नाळ जुळलेली आहे. त्यामुळे सर्वच पातळीवर चांगले काम होत आहे. पत्रकारांना शासनाने मानधन दिले पाहिजे. पत्रकार जनतेचे म्हणणे मांडतात. त्यानुसार शासन धोरण ठरवत असते. स्वातंत्र्योत्तर काळात पत्रकारांना क्रांतीकारक व समाजसुधारक म्हणत होते. आजचा पत्रकार सेवक म्हणून काम करत आहे. असे प्रतिपादन देखील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे आयोजन प्रा. राजेंद्र पवार म्हणाले की, प्रगल्भ विचारांचा पत्रकार उन्मत्त सरकार व राज्यकर्त्यांना जागेवर आणण्याचे काम करू शकतो. आज देशातील अनेक प्रश्न माध्यमातून मांडण्याची गरज आहे. जामखेड तालुक्यातील पत्रकार निस्पृह व निष्पक्षपाती लिखाण करत आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. लक्ष्मण ढेपे यांनी मानले. तसेच यावेळी वैजीनाथ पोले, शहाजी राळेभात, कैलास हजारे याशिन शेख, श्वेता गायकवाड या मान्यवरांनीही आपआपली मनोगते व्यक्त केली.







