गायत्री राळेभात यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल शितल कलेक्शनच्या वतीने सत्कार
जामखेड प्रतिनिधी
जामखेड प्रतिनिधी,
जामखेड येथे रहिवाशी असणारे नामदेव राळेभात यांचे चिरंजीव भुषण व सुनबाई गायत्री हे दोघेही उच्चशिक्षित असुन भुषण नामदेव राळेभात यांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी बाहेरील देशात निवड झालेली आहे तर गायत्री यांची मलेशिया येथे एक महिन्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी देखील निवड झाली होती.
आता गायत्री भूषण राळेभात यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा मध्ये PSI पदी निवड झाली आहे. जामखेड मध्ये त्यांचं आगमन होताच शितल कलेक्शन चे संचालक सागर अंदुरे व सर्व कर्मचारी यांनी psi गायत्री राळेभात व भूषण राळेभात यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना सागर अंदुरे म्हणाले,गायत्री भूषण राळेभात यांनी हे यश संपादनासाठी आपली मेहनत,चिकाटी,अभ्यासातील सातत्य आणि लग्न झाल्यावर सुद्धा अभ्यासातील आवड आणि ध्येय गाठण्याची जिद्द त्यांना या पदापर्यंत घेऊन आली आहे.आणि त्या या पदाला नक्कीच न्याय देतील आणि जामखेडच नाव उंचावतील यात शंका नाही त्यांना आमच्या कुटूंबातर्फे व शितल कलेक्शनच्या वतीने अभिनंदन.