अरणगाव येथील मोफत तपासणी आरोग्य शिबिरात २४४ रुग्णांची केली तपासणी

समर्थ हॉस्पिटलच्या सहकार्याने आ. प्रा. राम शिंदेच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले होते शिबिर

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथिल समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने आ. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आजारांच्या निदानाकरिता मोफत आरोग्य निदान व मोफत औषधोपचार शिबीराचे आयोजन आरणगाव येथिल भाजपा सरचिटणीस लहु शिंदे व आंकुश शिंदे यांनी केले होते. या शिबिरात २४४ रुग्णांनी तपासणी केली होती.

सोमवार (१ जानेवारी) सकाळी ९ ते १२ या वेळेत आरणगाव येथिल ग्रामपंचायत कार्यालयालया समोर हे शिबीर संपन्न झाले. या शिबिरात गुडघेदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार, मानदुखी, अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध भगंदर, मुतखडा, प्रोस्टेट, संधिवात, आमवात, मधुमेह, रक्तदाब, अर्धांगवायु व सर्व प्रकारचे त्वचाविकार या आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या.

शिबीरात समर्थ हॉस्पिटल चे प्रसिद्ध. हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉक्टर अमोल भगत हाडांचे तज्ञ श्रीनिवास लांब (नागरगोजे) मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. भरत दारकुंडे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात एकुण २४४ रुग्णांनी तपासणी करुन लाभ घेतला. याच बरोबर आ. प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरणगाव या ठीकाणी हिंदू योद्धा क्रिकेट क्लब अरणगाव क्रिकेट स्पर्धा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय साहित्य वाटप भारतीय जनता पार्टी चे पाधिकरी यांच्या हस्ते विद्यार्थी यांना देण्यात आले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अजय काशिद, सभापती शरद कार्ले, नगरसेवक डॉ ज्ञानेश्वर झेंडे, डॉ भरत दारकुंडे, डॉ. श्रीनिवास लांब, डॉ आमोल भगत, बापूराव ढवळे, अमोल शेट शिंदे, सरचिटणीस लहू शिंदे, सरपंच अंकुश शिंदे, उपसरपंच (आप्पा) राऊत, रमजान शेख, संचालक डॉ ससाणे, संचालक डॉ. गणेश जगताप, विष्णू गंभीरे, गोरख घनवट, ॲड संजय पारे, गाहिनाथ डमाळे, संतोष नन्नवरे, डॉ आलताब शेख, डॉ ओमसे, दीपक भोरे, विनोद उगले, आप्पा ढगे, किरण काळे, मेजर राऊत, सरपंच कांबळे, प्रमोद राऊत, सुरेश खोसे, हिंदू योद्धा क्रिकेट क्लब व सर्व शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here