एस टी बस व मोटारसायकलच्या आपघातात एक जण मयत तर दुसरा जखमी झाला होता. मात्र या आपघातात एस टी चालका ऐवजी मोटारसायकल चालकावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आपघातात मयत झालेल्या तरुणाचा मृतदेह जामखेड खर्डा रोडवर आणुन ठेवत रास्तारोको आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कळंब-पुणे बस वर दगडफेक केली. आखेर संबंधित एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर सदरचे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत समजलेली माहिती आशी की काल बुधवार दि २७ डिसेंबर रोजी दुपारी खर्डा शहराजवळ सिताराम गडाच्या पायथ्याशी जामखेड खर्डा रस्त्यावर मंबई-कळंब एस टी बस व मोटारसायकल यांच्या मध्ये आपघात झाला होता. या आपघातात सोनु आनिल काळे रा. खर्डा. वय २५ वर्षे याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मोटारसायकल चालवणारा चालक संदीप लहु पवार रा खर्डा. हा जखमी झाला होता.
घटनेनंतर खर्डा पोलीसांनी एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्या ऐवजी उलट बस चालकाच्या फीर्यादीवरुन मोटारसायकल आपघाता मध्ये जखमी झालेल्या व्यक्तीवरच दि २७ डीसेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल केला.
यानंतर मयत झालेल्या व्यक्तीवर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन आज सकाळी दि २८ रोजी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जखमीवर गुन्हा दाखल झाला याबाबतची माहिती संबंधित नातेवाईकांना समजल्या नंतर ते खर्डा पोलीस स्टेशनला गेले व तुम्ही एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्या ऐवजी मोटारसायकलवर जखमी झालेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल का केला? आसा जाब विचारला यानंतर पोलिसांन कडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नातेवाईकांनाच आरेरावीची भाषा वापरली आशी माहिती नातेवाईकांनी दिली.
या नंतर संतप्त झालेल्या खर्डा येथिल मयत व जखमी यांच्या नातेवाईकांनी आज दि २८ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. तसेच जखमी व्यक्तीवरील गुन्हा मागे घेऊन एस टी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सदरचा मृतदेह रस्त्यावर ठेऊन जामखेड खर्डा रस्त्यावरच ठीय्या व रास्तारोको आंदोलन केले. यावेळी संतप्त नातेवाईकांनी कळंब पुणे बसवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या. तसेच जो पर्यंत आपघातास कारणीभूत ठरलेल्या एस टी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला. आखेर एस टी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर रस्त्यावर सुरु आसलेले ठीय्या आंदोलन तब्बल एक तासा नंतर मागे घेत नातेवाईकांनी रात्री मयतावर अंत्यसंस्कार केले.
चौकट
पोलिसांवर आली नामुष्कीची वेळ
मोटरसायकल व एसटी बसचा अपघात होऊन एक जण जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. याबाबत खर्डा पोलीसांनी जखमी मोटारसायकल चालक याची फीर्याद घेण्याऐवजी एसटी बस चालकाचीच फिर्याद घेऊन जखमी तरुणावरच गुन्हा दाखल केला. याचे पडसाद दगडफेक व रास्ता रोको आंदोलना मध्ये झाले, नंतर पोलिसांनी सदरचा गुन्हा मागे घेण्याचे आश्वासन देऊन एसटी ड्रायव्हर वर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली अशी चर्चा उपस्थित ग्रामस्थांन मध्ये होती.