जामखेड येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणास दोन महीने पुर्ण.

सोनेगाव येथील मराठा बांधवांचा साखळी उपोषणात सहभाग

जामखेड प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून जामखेड येथे विविध गावातील मराठा बांधवांचे गेल्या दोन दिवसांपासून तहसील कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू आहे. आज शनिवार दि २३ डिसेंबर २०२३ रोजी तालुक्यातील सोनेगाव येथील मराठा बांधवांनी या साखळी उपोषणात सहभाग घेतला होता. या साखळी उपोषणास आज दोन महीने पुर्ण झाले आहेत.
साखळी उपोषणा दरम्यान मराठा बांधवांनी महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारने या मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहुन मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडुन मराठा समाजाला आरक्षण लागु करावे अशी मागणी केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण देणारच म्हणून मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन नतमस्तक होऊन मराठा समाजाला आरक्षण देणारच आसे आश्वासन मराठा दिले आहे. मात्र तरी देखिल अद्याप मराठा आरक्षणावर तोडगा निघाला नाही. तसच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल २४ तारखेला जो निर्णय घेतील त्या निर्णया नुसार आम्ही चालणार आसुन त्या पद्धतीने आंदोलने करणार असल्याचे देखील सरपंच डॉ. विशाल वायकर यांनी साखळी उपोषणा दरम्यान बोलताना सांगितले. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाही घेतल्या शिवाय रहाणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या.
या साखळी उपोषणात सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन (सर) गायवळ, सरपंच डॉ. विशाल वायकर, दत्तात्रय जाधव, रामकिसन बोलभट, रावसाहेब वायकर, दादासाहेब गायवळ, दादासाहेब खोटे, गोकुळ बिरंगळ, मोहन पवार, पोपट बिरंगळ, गणेश जाधव, विकास भोसले, सागर गायवळ, नशिबवान भोरे, दिलीप गायवळ, संजय जाधव, महाविर खोटे , संतोष चव्हाण, सुजित वायकर, महादेव शिंदे, काका टेकाळे, सह आनेक मराठा बांधव सहभागी झाले होते.
यावेळी प्रा. मधुकर (आबा) राळेभात, अवदुत पवार, केदार रसाळ, शहाजी राळेभात, संभाजी राळेभात, विकास (तात्या) राळेभात, दत्तात्रय सोले, तात्या बांदल, महेश यादव, डॉ. भरत देवकर, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ सुशिल पन्हाळाकर, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, प्रशांत राळेभात, अमित जाधव सह मराठा बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here