पिंपळगाव उंडा शाळेचा कु. सार्थक सुशेन गव्हाणे गणित विज्ञान प्रदर्शनात तालुक्यात प्रथम……

जामखेड प्रतिनिधी

४८ व्या जामखेड तालुकास्तरीय गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनात जि. प. प्रा. शाळा पिंपळगाव उंडा या शाळेचा इ. सहावीचा विद्यार्थी कु.सार्थक सुशेन गव्हाणे याने ६ वी ते ८ वी गणित या गटात प्रथम क्रमांक मिळविला. गुणाकाराची निराळी पद्धत प्रतिकृती त्याने सादर केली.

जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब व प्रमुख पाहुणे यांच्या प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपञ देऊन अमृता तिचे पालक व शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. नवोदय, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षेत गणित विषयाचे अनन्यसाधारण महत्त्व असून कमी वेळात उत्तरे शोधणारा विद्यार्थी यात यशस्वी होतो. सार्थक याने गणित विषयात शाळास्तरावरही अनेक प्रतिकृती तयार केलेल्या आहेत.

शाळेच्या या यशाबद्दल खर्डा बीटचे विस्तार अधिकारी तथा तेलंगशी खर्डा केंद्रप्रमुख केशव गायकवाड पिंपळगाव उंडा गावचे सरपंच सौ शिल्पाताई जगताप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबा ढगे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गव्हाणे, ग्रामस्थ व पालक यांनी सार्थक व शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत गायकवाड, सदाशिव भालेराव, वर्गशिक्षक, गणित विज्ञान शिक्षक प्रमोद पिंपरे, प्रविण ढगे, ब्रह्मदेव हजारे, श्रीमती सारिका निमसे मॅडम या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here