कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी जामखेड येथे शिक्षण विभगातील कनिष्ठ सहायक गोरख नरवणे निलंबीत !
जामखेड प्रतिनिधी
गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ सहायक गोरख नरवणे हे वारंवार कार्यालयात गैरहजर रहात होते. परीणामी शिक्षकांची व प्रशासकीय कामे होत नव्हती. त्यांना अनेक वेळा सुचना व नोटीस दिल्या परंतु त्यांच्या वर्तनात व कामकाजात कोणताही बदल झाला नाही. आखेर गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी निलंबनाचा प्रास्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना पाठविला होता. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कनिष्ठ सहाय्यक गोरख नरवणे यांना सेवानिलंबीत केले आहे.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे हे जामखेड तालुक्यात हजर झाल्यापासूनच शिक्षकांना चांगली शिस्त लावली तर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले त्यामुळे जामखेड तालुक्यात कधी नव्हे ते एवढे चांगले शैक्षणिक वातावरण प्रथमच तयार झाले असून वेगवेगळे उपक्रम राबवून चांगली शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे.
परंतु हे करत असताना गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ सहायक श्री. गोरख नरवणे हे वारंवार कार्यालयात गैरहजर राहिल्याने शिक्षकांची व प्रशासकीय कामे होत नव्हती . त्यांना अनेक वेळा सुचना व नोटीस दिल्या परंतु त्यांच्या वर्तनात व कामकाजात कोणताही बदल झाला नाही , त्यामुळे धनवे यांनी त्यांचा निलंबनाचा प्रास्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना पाठविला होता.
याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर यांनी श्री. गोरख नरवणे कनिष्ठ सहायक यांना सेवानिलंबीत केले आहे .व निलंबन काळात मुख्यालय पंचायत समिती अकोले देण्यात आले आहे. श्री . धनवे हे अॅक्शन मोडवर आल्यामुळे कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.