स्वस्तात जमिन व सोने देण्याच्या बहाण्याने पुण्याच्या व्यापाऱ्यास जामखेडला दहा लाखांना लुटले
दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली अटक
जामखेड प्रतिनिधी
जमिन व स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने पुणे येथील व्यापाऱ्यास जामखेड तालुक्यातील राजुरी या ठीकाणी बोलवून लाकडी काठ्याने मारहाण करून व चाकुचा धाक दाखवून दहा लाख रुपयांना लुटले. या प्रकरणी सात ते आठ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की फीर्यादी व्यापारी रघुनाथ ऋषिकेश शिंदे वय ४८ वर्षे रा.संतोष नगर , कात्रज, पुणे यास यातील आरोपी कुशी भोसले , कारभारी भोसले (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्या सह इतर काही अनोळखी आरोपींनी दि ३० नोव्हेंबर २०२३ ते ८ डीसेंबर २०२३ रोजी च्या सुमारास फिर्यादीस व साक्षीदार यांना जमिन व वापरते सोने देण्याचे आमिष दाखविले. यानंतर त्यांना जामखेड तालुक्यातील राजुरी शिवारात बोलवण्यात आले. व हाताने व काठ्याने मारहाण केली. तसेच चाकुचा धाक दाखवून फीर्यादी व साक्षीदार यांच्या जवळील १० लाख ११ हजार रुपये रोख रक्कम व दोन हँडसेट मोबाईल असा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी व्यापारी रघुनाथ ऋषिकेश शिंदे रा.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपींन विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर कर्जत उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत वाखारे, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगोदरही सोन्याच्या आमिषाने मोठ्या प्रमाणात जामखेड तालुक्यात लुटमार व खुनही झालेले आहेत. या प्रकरणी कारभारी भोसले व महीला आरोपी निर्गुणा काळे या दोन आरोपींना जामखेड पोलीसांनी अटक करण्यात आली आहे. त्यांना जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वरील दोन्ही आरोपींना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here