दिंडीत ट्रक घुसल्याने चार वारकऱ्यांच्या दुर्दैवी म्रुत्यू ; आठ वारकरी जखमी.
अहमदनगर- शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीला संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील 19 मैल जवळ अपघात झाला. पालखी संगमनेरच्या दिशेनी आळंदीकडे जात असतांना मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा अपघात घडलाय. या अपघातात चार जणांचा मृत्यू तर आठ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींनवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज हे दरवर्षी शिर्डी ते आळंदी श्री साईबाबा पालखी सेहळा गेल्या 36 वर्षांना पासुन आयोजीत करतात यंदाच्या 37 वे वर्ष आहे या पालखीत, नाशिक, शिर्डी, अहमदनगर जिल्ह्यात साधरणात 250 ते 300 वारकरी सहभागी झाले होते. ही पालखी गुरुवारी शिर्डीतून आळंदीच्या दिशेने रवाना झाली होती. पालखी संगमनेर तालुक्यातील पुणे -नाशिक महामार्गावरील 19 मैल येथे पोहचली असतांना अचानक भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने पुण्याकडे जात असलेला MH12, VT 1455 नंबरचा कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा अपघात झाला असुन या अपघातात चार जणांचा जागीच तर एका वारकऱ्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचं समजतंय तर नऊ वारकरी जखमी असुन जखमींना संगमनेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
ही दुर्दैवी घटना आज रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या अपघाताला कारणीभूत असणारा कंटेनर चालक नशेत असल्याचे व त्याला डुलकी लागली असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणने आहे. या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची ओळख पटली असून भाऊसाहेब नाथा जपे (कनकुरी), बाळासाहेब अर्जुन गवळी (मढी बु, ता. कोपरगाव), बबन पाटीलबा थोरे (द्वारकानगर, शिर्डी), ताराबाई गंगाधर गमे (कोऱ्हाळे, ता. राहता) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. तर बिजलाबाई अशोक शिरोळे (वय ५५, रा. वाकडी, ता. राहता), राजेंद्र कारभारी सरोदे (वय ५५, रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड (वय ६९, रा. वेस, ता. कोपरगाव), ओंकार नवनाथ चव्हाण (वय १७, रा. मढी खुर्द, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (वय ७५, रा. पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक), शरद सचिन चापके (वय १७, रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळे (वय ३५, रा. ज्ञानेश्वर मंदिर, शिर्डी), मीराबाई मारुती ढमाळे (वय ६०, रा. दुशिंगवाडी, वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. दरम्यान आजूबाजूच्या नागरीकांनी तात्काळ जखमींना मदत करत वारकर्यांना दिलासा दिला आहे.