मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण दोघे लग्न करू आसे म्हणून आरोपी याने पिडीत अल्पवयीन मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला. या नंतर मुलीने हा प्रकार आपल्या घरी सांगल्यावर आरोपी रियाज बालीश शेख रा. पिसोरे खांडगाव ता. श्रीगोंदा याचे विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील हाळगाव येथे राहणारी १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनी ही दि. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी वाजता हळगाव शिवारातील कृषी विद्यालयाजवळील जंगलात आरोपी रियाज बालीश शेख हा यातील फिर्यादी अल्पवयीन पिडीत मुलीस त्यांचेकडील मोटारसायकल वरुन घेवून जात असताना गांव शिवारातील कृषी विद्यालया जवळील जंगलात घेवुन गेला गाडीवरुन खाली उतरवून तिचे हाताला धरून जवळ ओढुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिला म्हणाला की, ” मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण दोघे लग्न करु”, त्यावर यातील फिर्यादी हिने आरोपीस तिला तिचे घरी हाळगाव येथे सोडण्याची विनंती केली.
तरी देखील आरोपी रियाज शेख याने फिर्यादीस दोन मिनीट थांब असे म्हणून परत फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावरून सदर १७ वर्षीय अल्पवयीन पिढीतेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रियाज बालीश शेख रा. पिसोरे खांडगाव ता. श्रीगोंदा याचे विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.